मला वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात -अभिनेत्री प्रतिक्षा जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food

मला वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात -अभिनेत्री प्रतिक्षा जाधव

मी फुडी आहे. मला वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात. माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे केळाचा शिरा म्हणजे प्रसादाचा शिर. त्यात गाईच दूध आणि ड्राय फ्रूट असतात. ते माझ्या आवडीचे आहे. मला माझ्या आईच्याच हातचाच शिरा आवडतो. कारण मी खूप ठिकाणी खाल्ला ; पण मला नाही आवडला. माझी आई सुगरण असल्यामुळे तिच्या हातचा खूप आवडतो.

मी खूप प्रवास करत असते. प्रत्येक राज्यातले फूड मी ट्राय केलेत. जसे इंदोरची कचोरी मला खूप आवडते. जेव्हा मी दिल्लीला जाते तेव्हा मला पाणीपुरी किंवा चाट प्रकार खूप आवडतो. मक्के की रोटी आणि सरसो का साग मी तिथला खाल्लेला आहे. पंजाबमधील लस्सी किंवा वेगवेगळे पदार्थ खूप वेळा ट्राय केले आहे. बंगलोरचा मैसूर पाक खूप आवडतो.

मला कूकिंग करायला खूप आवडत. लॉकडाउनमध्ये ती संधी मिळाली. कारण शूटिंगदरम्यान स्वयंपाक करायला वेळ नसतो. पण जेव्हा लॉकडाउन होता तेव्हा माझी इच्छा पूर्ण झाली. मी रोज वेगवेगळे पदार्थ बनवायचे. केक बनवला, कचोरी, समोसा, मोमोज असे फूड आम्ही ट्राय केले.

Food

Food

मला सगळ्यात जास्त बनवायला आवडणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. ती मला चांगली जमते. ती मी आईकडून शिकले. मला न आवडणारा पदार्थ म्हणजे ढोबळी मिरची. मला त्याने अॅसिडिटी होत असल्यामुळे मी ती खातही नाही.

माझी आई डिंकाचे लाडू खूप स्वादिष्ट बनवते. आजपर्यंत मी डिंकाचे लाडू बाहेरही खाल्ले आहेत. पण माझ्या आईची जरा वेगळी रेसिपी आहे. खरंतर आमचा तो बिझिनेस पण आहे. माझे सर्व मित्र, नातेवाईक, को ॲक्ट्रेससुद्धा माझ्या आईकडून लाडू बनवून घेतात. मला रेसिपी सांगता येते. कारण मी आईला मदत करते. त्यासाठी डिंक, खोबऱ्याचा किस, सगळे ड्राय फ्रूटस, रासायनिक प्रक्रिया न केलेला गुळ, गाईचं तूप हे सर्व तुपामध्ये फ्राय करून क्रश करतो. डिंक दळल्यानंतर तो कुरकुरीत राहतो. मग आम्ही लाडू बनवले की त्यावरून डिंक टाकतो. ते खायला मज्जा येते.

मी खूप लहानपणापासून स्वयंपाक करायला शिकले . मी पहिल्यांदा शिकले होते वरण भात. त्यावेळी माझ्याकडून वरण चुकल होत. मी दहावीत असताना माझी आई खूप आजारी होती. स्वयंपाक करायला कोणी नव्हतं. मग माझ्या बाबांनी मला वरण बनवायचं शिकवल. ते बिघडल अस की आपण फोडणी द्यायला मिरची, जिरे, टोमॅटो टाकतो. मी डायरेक्ट वरण टाकल, मग ते सर्व कच्च राहिल.

माझी आई सुगरण असली तरी मी पहिल्यांदा स्वयंपाक शिकले तो बाबांकडून. मला चीझ केक खूप आवडतो. मी युरोपला गेले की चीझ केक खाते. तिथल्या सारखा चीझ केक मी कुठेच खाल्लेला नाही.