Food : ‘जिभेचे चोचले पुरवायला आवडतं’; कुणाल खेमू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food

‘जिभेचे चोचले पुरवायला आवडतं’; कुणाल खेमू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- ग्लॅम-फूड

बॉलिवूडमधील सगळेच अभिनेते पिळदार शरीरयष्टी मिळवण्यासाठी काटेकोर डाएट फॉलो करतात. कुणाल खेमू हा अभिनेता मात्र त्याला अपवाद आहे. कुणालचे खाण्यावर प्रचंड प्रेम आहे. जिभेचे चोचले पुरवणारे सगळेच पदार्थ खायला तो प्राधान्य देतो.

त्याचे मेटाबोलिझम चांगले आहे, त्यामुळे खाल्लेले सगळे त्याला पचते आणि अंगावर फॅट दिसत नाही. त्यामुळे ‘मी जे खातो ते बघून अनेकांना धक्का बसतो,’ असे कुणाल म्हणतो.

भारतीय पद्धतीच्या खाद्यपदार्थांबरोबरच त्याला चायनीज खाद्यपदार्थदेखील खूप आवडतात. रोगन जोश, क्रीम बृले, सिझलर या खाद्यप्रकारांवर त्याचे विशेष प्रेम आहे. मुंबईतील दोन प्रसिद्ध रेस्टॉरंट्समध्ये तो फक्त चायनीज आणि तेथील सिझलर खायला जातो. ही दोन ठिकाणे सोडल्यास इतरत्र कोठेही तो काही खात नाही. इतर वेळी घरगुती पद्धतीचे पदार्थ खायलाच तो प्राधान्य देतो.

ज्या पदार्थांमध्ये चीजचा वापर केलेला असतो, त्या पदार्थांपासून तो लांब राहतो. तसेच त्याला बेक केलेले पदार्थही फारसे आवडत नाही. त्याला गोडाचे पदार्थही तितकेसे आवडत नाहीत. मनापासून खवय्या असणारा कुणाल दिवसातून तीन मिल्स घेतो. ज्यात सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण याचा समावेश असतो.

आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा वापर करतो. त्याला फळे आणि भाज्या खाण्यापेक्षा त्यांचे ज्यूस प्यायला अधिक भावते. ‘कारल्याचा ज्यूस’ त्याचा फेव्हरेट आहे. पाणीपुरीचाही तो फॅन आहे. कुणालला ज्यावेळी शूटिंगसाठी सेटवर जायचे नसते त्यावेळी तो विरंगुळा म्हणून स्वयंपाक करतो. स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग करायला त्याला आवडतात. दाल, भात आणि कोणतीही भाजी तो उत्तम प्रकारे करू शकतो. नूडल्ससुद्धा त्याला छान जमतात. पत्नी सोहा अली खानपेक्षा तरी आपण चांगला स्वयंपाक करू शकतो, असा त्याचा दावा आहे आणि सोहासुद्धा त्याच्याशी सहमत आहे. कुणालची आई सुगरण असून त्याला आईचे हातचे खाद्यपदार्थ प्रचंड आवडतात. त्याचे कुटुंब श्रीनगरचे असल्याने तिच्या हातचे काश्मिरी पद्धतीचे पदार्थ खाणे तो पसंत करतो.

loading image
go to top