esakal | मार्केटमधील पपई ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स

बोलून बातमी शोधा

 मार्केटमधील पपई ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स
मार्केटमधील पपई ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात उष्णता वाढत आहे. याचा अंदाज तुम्ही बाजारमध्ये उपलब्ध असलेल्या पपईवरून लावू शकता. गरमीच्या दिवसात पपई खुप विकला आणि खाल्ला जातो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक हंगामात पपई मिळतोच. परंतु या दिवसात उत्तम प्रतीचा पपई आणि खाण्यासाठी गोड असतो

चांगल्या प्रतीचा आणि गोड पपई तुम्ही तेव्हाच खाऊ शकता जेव्हा तुम्ही तो खरेदी करून आणा. लोकांना याची माहिती नसते की कोणते पपई गोड असतात. कधी कधी तो वरून चांगला दिसतो. असा अंदाज लावून तू गोड असेल म्हणून खरेदी केला जातो. घरी आल्यानंतर त्याला कापल्यावर तो आतून पिकलेला किंवा गोड नसतो. फिका असतो. पपई हे आरोग्यासाठी चांगले आहे परंतु याला पाहून जर नीट खरेदी केला नाही, तर तुम्ही पपई खाऊन आजारी पडू शकता. आज तुम्हाला पपई कसा खरेदी करावा याविषयी काही माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही बाजारातून गोड आणि चांगल्या प्रतीचा पपई खरेदी करू शकता..

पिकलेला पपई कसा ओळखावा

लोक जेव्हा बाजारातून पपई खरेदी करतात त्यावेळी ते फक्त रंग बघून खरेदी केला जातो. पपईचा पिवळा रंग पाहून तो पिकला असावा असे मानून त्याला घरी आणले जाते. परंतु हे ओळखण्याची एक वेगळी पद्धत आहे. यासाठी तुम्ही त्यावरती असलेल्या पिवळ्या शिरांना पाहू शकता. पपईवर पिवळा किंवा नारंगी रंगाच्या शिरा असतील तर तो पिकलेला आहे असे समजावे. थोडा हिरवट कलर असेल तर ते पपई खरेदी करू नये.

पपईचा वास

पपईचा वास तुम्ही ओळखू शकता. त्यावरून तुम्हाला तो गोड आहे की नाही समजू शकते. साधारणतः ज्या पपईमधून वास येतो ते आतून पिकलेले आणि गोड असते. त्यामुळे पपई खरेदी करताना हा वास तुम्ही नक्की चेक करा.

पपईची साल

जर पपई वजनाने जास्त असेल किंवा त्याचे साल मोठे असेल तर समजुन जा की तो पूर्णपणे पिकलेला आहे. त्यापद्धतीने पपईच्या पुढील आणि मागील या दोन्ही बाजू चेक करून घ्या. जर पपईमध्ये हिरवट रंग दिसत असेल किंवा दाबल्यानंतर ते कडक वाटत असेल तर समजा की तो खरेदी करण्यास योग्य नाही.