Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी इडल्या कशा तयार करायच्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nutritious Triangi Idlis

Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी इडल्या कशा तयार करायच्या?

यंदा आपण भारताचा (India) 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवांतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा (har ghar tiranga) हे अभियान साजरा होत आहे. या दिवसाचा संबंध तिरंग्याशी असल्याने या दिवशी बाजारातही अनेक मिठाई तिरंग्याच्या रंगासारख्या असतात. सगळच वातावरण तिरंगमय झालेले असते. अशातच आज आम्ही तुम्हाला 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मुलांसाठी स्पेशल दिवसासाठी ही तिरंगा ईडली कशी तयार करायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य:

तिन वाटी ईडली तांदूळ

एक वाटी धुतलेली सफेद उडीद डाळ

एक चमचा मीठ

गाजर प्युरी

पालक प्युरी

हेही वाचा: Independence Day 2022: पौष्टिक झटपट तिरंगी ढोकळा कसा तयार करायचा?

कृती:

सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ वेगवेगळी दोन तास भिजवावी.

नंतर त्यातील पाणी उपसून मिश्रण वाटावे.

नंतर 12 तासासाठी हे वाटलेले मिश्रण एका पातेल्यात झाकून ठेवावे.

मिश्रम चांगले आंबले की तीन भाग करावे.

त्यातील एका भागात गाजर प्युरी तर दुसऱ्या भागात पालक प्युरी टाकावी. नंतर चवीनुसार मीठ टाकावे.

नंतर ईडलीपात्रात सर्वात आधी गाजर प्युरीवाले मिश्रण टाकावे. त्यावर पांढरे मिश्रण टाकावे नंतर हिरवे मिश्रण टाकावे. वीस मिनिट स्टीम करावे. नंतर हिरव्या चटणीबरोबर या तिरंगी ईडली खाण्यास द्याव्या.

Web Title: Independence Day 2022 How To Make Nutritious Triangi Idlis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..