
जन्माष्टमी 2025 साठी साबुदाण्याच्या एकाच मिश्रणाने खिचडी, वडा, थालीपीठ, लाडू आणि खीर बनवा.
साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे आणि मसाले वापरून उपवासाचे ५ खमंग पदार्थ सहज तयार करा.
या पदार्थांनी जन्माष्टमीचा उपवास स्वादिष्ट आणि भक्तीमय बनवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा.
Janmashtami Special Sabudana Recipe: जन्माष्टमी फक्त एका दिवसावर येऊन ठेपली आहे. यंदा 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पुर्ण होतात. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. उपवासा दरम्यान बटाट्याचे पदार्थ, भगर,साबुदाणा, खिचडी यासारखे पदार्थ बनवतात. पण तुम्हाला माहिती आहे का साबुदाण्याच्या एकाच मिश्रणापासून पाच प्रकारचे चवदार पदार्थ बनवू शकता.