Janmashtami Upvas Special: Easy Stuffed Nariyal Kachori Recipe in 20 Minutes
esakal
Janmashtami Vrat Special Nariyal Kachori Recipe: जन्माष्टमीच्या पवित्र प्रसंगी अनेक भाविक दिवसभर उपवास करतात. या दिवशी धान्याचे पदार्थ खाण्यास मनाई असल्याने उपवासासाठी साबुदाणा, वरी किंवा बटाट्याचे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. अशा वेळी उपवासाच्या नेहमीच्या फराळाला फाटा देऊन काहीतरी चविष्ट, कुरकुरीत आणि वेगळे खायचे असेल, तर नारळ कचोरी हा उत्तम पर्याय आहे. ज्याला 'बफ वडा' असेही म्हणतात.
गुजराती खाद्यसंस्कृतीत प्रसिद्ध असलेला हा बफ उकडलेल्या बटाट्याचे आवरण आणि आत ताजे खोबरे, काजू-मनुका, हिरवी मिरची अन् कोथिंबिरीचे चटपटीत सारण भरून तयार केला जातो. फक्त २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.