
साहित्य - काजू १ वाटी मोठी, साखर १ लहान वाटी, २ लहान चमचे तूप.
साहित्य - काजू १ वाटी मोठी, साखर १ लहान वाटी, २ लहान चमचे तूप.
कृती : सोललेले काजू प्रथम मिक्सरला फिरवून घ्या. (मिक्सर चालू-बंद करत चालवायचा.) आता पॅनमध्ये साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी ओतून गॅसवर ठेवा. मिश्रण हलवत राहा. साखर पूर्ण वितळली आणि थोडी घट्ट झाली की, त्यात काजू पावडर टाकून मिश्रण पुन्हा हलवा. २ चमचे तूप मिक्स करा. मिश्रणाचा घट्ट गोळा बनत आला की, गॅस बंद करा. गोळा प्लेटमध्ये काढून घ्या. तुपाच्या हाताने एकजीव करून घ्या. नंतर जाड प्लॅस्टिकवर किंवा बटर पेपरवर जाडसर पोळी लाटा आणि डायमंड शेपमध्ये काप करा.