Kashmiri Tea Recipe: हिवाळ्यात आरोग्यदायी काश्मिरी काहवा चहा घरच्या घरी कसा तयार करायचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmiri Tea Recipe

Kashmiri Tea Recipe: हिवाळ्यात आरोग्यदायी काश्मिरी काहवा चहा घरच्या घरी कसा तयार करायचा?

चहा हे भारतातील लोकप्रिय पेय आहे.बहुतेक ठिकाणी चहा बनवण्याची पद्धत थोडीफार एकसारखीच आहे.पण काही ठिकाणी चहा बनवण्यासाठी पद्धत पूर्णपणे वेगळी आहे.काश्मिर प्रांतात खास पारंपरिक पद्धतीने काश्मिरी काहवा चहा बनवला जातो. हिवाळ्यात सर्दी आणि कफ होण्याची समस्या सामान्य आहे. पण या चहामुुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

आता बघू या हिवाळ्यात काश्मिरी काहवा चहा पिण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे?

1) काश्मिरी काहवा चहा हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. हा चहा पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. थोडक्यात काय तर हा चहा चवदार तर असतोस सोबतच शरीराकरता हेल्दी देखील असतो. 

2) थंडीतील डोकेदुखीवर हा चहा रामबाण उपाय आहे. या चहाचे सेवन केल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते. 

3) तुम्हाला जर का थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही नक्की हा चहा

होण्याचे काम करते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. याचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते.

काश्मिरी काहवा चहा करता लागणारे साहित्य

1) ग्रीन टी पावडर

2) दालचिनी

3) केशर

4) पाणी

5) हिरवी वेलची

6) साखर

7) कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या

हेही वाचा: Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

कृती:

काहवा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात दालचिनी, छोटी वेलची आणि केशर घाला. ते चांगले उकळवा.आता या मिश्रणामध्ये ग्रीन टी पावडर आणि साखर घाला. ते काही मिनिटे उकळवा. उकळल्यानंतर गॅस बंद करा. आता हा काहवा एका कपमध्ये गाळून घ्या. आता गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही काहवाला बदाम, पिस्ता, काजू आणि कोरड्या गुलाबाच्या पाकळ्यांनी देखील  सजवू शकता.

टॅग्स :recipeTeaWinterhealth