esakal | असे बनवा केसर कलाकंद!

बोलून बातमी शोधा

Kesar Kalakand recipe}

एकदा का तुम्ही कलादंत बनवला की तुम्ही परत परत ते नक्की बनवाल.

असे बनवा केसर कलाकंद!
sakal_logo
By
धनाजी सुर्वे

खास करून राम नवमीला उत्तर भारतात केसल कलाकंद हा पदार्थ बनवला जातो. कलाकंद हे आपली पारंपरिक भारतीय पाककृति आहे. बनवायला एकदम सोपा आणि स्वादिष्ट असेला हा मिठाईचा पदार्थ. एकदा का तुम्ही कलादंत बनवला की तुम्ही परत परत ते नक्की बनवाल. वीस मिनिटात हा पदार्थ तयार करून होतो. पण त्याची चव दिवसभर जीभेवर रेंगाळत राहते.  
 
 वीस मिनिटात कलाकंद तयार
तयारीसाठी पाच मिनिटे
तयार होण्यासाठी १५ मिनीटे
हा वेळ कलाकंदच्या १५ पीससाठी आहे.  

साहित्य 
300 ग्राम पनीर 
कंडेंस्ड मिल्क घरी बनवलेले चारशे ग्रॅम
हिरवी वेलची कुटलेली सात ते आठ 
एक टेबलस्पून गुलाब पाणी 
दहा ते बारा पिस्ता, काजू, बादाम
थोडासा केसर
 
कृती 
१) एका कडईमध्ये कंडेंस्ड मिल्क गरम करा
२) त्यामध्ये पनीर मिसळून घ्या. गरम मिश्रणात थोडे केसर टाका
३) थोडे-थोडे हालवत हे मिश्रण गरम करा. कडईला हे मिश्रण चिकणार नाही याची काळजी घ्या. किमान पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण तापवा.  
४) हे मिश्रण थोडे घट्ट झाले की समजू जावा की तुमचे कलाकंद वड्या (पीस) करण्यासाठी तयार झाले आहे. 
५) कलाकंदचे पीस करण्याआधी प्रथम वेलचीची पावडर मिसळा
६) एका डब्यात किंवा ताटात हे मिश्रण घेऊन ते समान करा. 
७) त्यावरून बारीक कापलेले काजू, बदाम आणि पिस्ता पसरून टाका आणि हळूहळू ते दाबा. 
८ ) घरातील तापमानावरच हे मिश्रण ठंड होऊ द्या. नंतर ते फ्रिजमध्ये ठेवा. हे मिश्रण सेट झाले की ते वडीच्या आकारात कापून घ्या
 
टीपः जर तुम्ही गोड कंडेंस्ड मिल्कचा वापर करणार असाल तर ते दूध चांगले उकळून घ्या.