ग्लॅम-फूड : ‘साखर, मीठ, तेलाचा संतुलित वापर हवा’ | Kiara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kiara advani
ग्लॅम-फूड : ‘साखर, मीठ, तेलाचा संतुलित वापर हवा’

ग्लॅम-फूड : ‘साखर, मीठ, तेलाचा संतुलित वापर हवा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- कियारा अडवानी

कियारा अडवानी तिच्या खाण्याच्या बाबतीत खूपच सजग असते. कियारा खवय्यी आहे. विविध प्रकारचे पदार्थ खायला तिला पुष्कळ आवडतात; पण डाएटमुळे खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागते. ती नेहमी सकस आहारावर भर देते आणि फिट राहण्यासाठी ती नियमित व्यायामाबरोबरच योग्य डाएटला प्राधान्य देते.

कियारा तिच्या तिच्या दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करते. लिंबू पाण्यामुळे शरीर ‘डिटॉक्सिफाय’ होते आणि पोट ब्रेकफास्टसाठी ‘रेडी’ होते, असे ती सांगते. सकाळचा ब्रेकफास्ट हा आरोग्याला परिपूर्ण ऊर्जा देणारा असावा, असे तिचे म्हणणे आहे. ती नाश्त्यामध्ये सफरचंद आणि चिया बिया असलेले पीनट बटर घेते. नाश्त्यामध्ये ती ओट्स खाणेही पसंत करते. याचबरोबरच तिला अंजीर आणि शेंगदाणे विशेषतः अक्रोड खूप आवडतात. दुपारचे जेवण करताना घरी बनवलेल्या पदार्थांनाच कियारा प्राधान्य देते. तिच्या जेवणात सामान्यतः घरगुती नाचणीची भाकरी, डाळ, राजगिरा भाज्या असतात. जेवणामध्ये लिंबू आणि मिरपूड नेहमी लागते. चिकन आणि फ्राय भाज्यांसह जेवण खूप छान होते, असे ती सांगते. भाज्यांमध्ये पालक, मोड आलेली कडधान्ये, भेंडी, भोपळा या गोष्टी तिला आवडतात. रात्रीचे जेवणही शक्यतो असेच असते.

कियाराला डार्क चॉकलेट खूप आवडते. फळांमध्ये तिला विशेषतः किवी आणि ब्लूबेरी आवडतात. कियारा साखर, मीठ आणि तेल यांचा कमीत कमी वापर असलेले पदार्थ शक्यतो खाते. ‘क्रॅश डाएट’ करण्यापेक्षा आहार मध्यम प्रमाणात घेणे हीच गोष्ट अतिशय प्रभावी असल्याचे तिचे म्हणणे आहे. दीर्घकालीन दृष्टीने आरोग्याची काळजी घेणे हिताचे असल्याचे ती मानते.

कियाराला तिच्या वडिलांनी बनवलेले मासे खूप आवडतात. कियारा स्वतःही स्वयंपाक चांगला करते. तिने तिचा भाऊ मिशाल अडवानीसाठी कुकीज केल्या होत्या. लॉकडाउनमध्ये कियाराने तिच्या कुटुंबासाठी स्वादिष्ट पदार्थ तयार केले आणि इन्स्टाग्रामवर तिच्या पाककौशल्याची झलक दिली.

loading image
go to top