उन्हाळ्यातही दूध होणार नाही खराब; फॉलो करा या ट्रिक्स

milk
milkesakal

उन्हाळ्यात फळे आणि भाज्या याव्यतिरिक्त असे बरेच पदार्थ आहेत जे काळजीपूर्वक साठवून ठेवले नाही तर ते लगेच खराब होतात. तसेच बर्‍याच वेळा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही भाज्या आणि दुध खराब होतात. अशावेळी फ्रिजमध्ये न ठेवता देखील दुध अधीक काळासाठी चांगले ठेवयचे असेल तर काय करावे या बद्दल आपण आज काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत. (know-how-to-avoid-milk-curdling-in-summer-article)

बेकिंग सोडा वापरा

बर्‍याच वेळा आपण दूध उकळून ठेवायला विसरतो, नंतर जेव्हा आपण ते गॅसवर ठेवतो तेव्हा ते खराब होते. ते खराब होऊ नये यासाठी एक ट्रिक वापरता येऊ शकते. जेव्हा आपण दुध उकळण्यासाठी गॅसवर ठेवतो तेव्हा त्यात एक चिमूटभर बेकिंग सोडा घाला आणि चमच्याने ते मिक्स करा. यानंतर जेव्हा आपण दुध गरम कराल तेव्हा ते खराब होणार नाही. जेव्हा कधी तुम्ही दूध गरम करुन ठेवायला विसराल तेव्हा ही ट्रिक वापरु शकता.

स्वच्छ भांडी वापरा

दूध ज्या भांड्यात किंवा पातेल्यात गरम करत आहात ते पातेलं अगदी स्वच्छ हवं. जर त्यात साबणाचे डाग किंवा अन्य काही पदार्थांचे डाग असतील तर दूध खराब होऊ शकतं. आपणास कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पुन्हा एकदा ते भांडे पाण्याने धुवा. यानंतर, भांड्यात दूध ओतण्यापूर्वी, एक किंवा दोन चमचे पाणी खाली घाला, त्यामुळे ते तळाशी चिकटत नाही आणि मलई देखील चांगली गोठते.

दिवसभरात चार वेळा गरम करा

उन्हाळ्यात दूध खराब होण्यापासून रोखण्यासाठी, 24 तासांत सुमारे 4 वेळा ते गरम करा. उकळताना गॅसची फ्लेम जास्त राहू नये याची काळजी घ्या. दोन ते तीन वेळा उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडा वेळ भांडे उघडा ठेवा. नंतर जेव्हा दूध कोमट होईल तोपर्यंत झाकण आणि भांड्यात थोडी जागा मोकळी ठेवा.

milk
मॅगी शिल्लक असेल तर फेकू नका, बनवा जबरदस्त रेसीपीज्

पॅकेटमधील दुधसाठी पध्दत..

बऱ्याचदा पॅकेटमधील दुध हे नॉर्मल तापमानाला ठेवली की लगेच खराब होते. त्यामुळे घरी आणल्याबरोबर लगेच ते गरम करुन ठेवावे लागते, मात्र तज्ञांच्या मते, हे दुध जास्त वेळ उकळले जाऊ नये कारण मुळात पास्चराइज्ड दुध गरम करण्याची आवश्यकता नाही. कंपनी पॅक करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे दुध पास्चराइज करत असते. त्यामुळे पुन्हा गरम केल्याने त्यात असलेले पोषकद्रव्य कमी होते. त्यामुळे पॅकेटमध्ये मिळणारे दुध ताबडतोब संपवून टाका.

हे लक्षात ठेवा

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपण सामान्य तपमानाला दुध लवकर खराब होते. म्हणूनच खूप गरम किंवा थंड दूध कधीही खराब होत नाही. अशा स्थितीत दुध खराब होण्यापासून रोखण्यासाठी, एकतर ते गरम ठेवा किंवा ते पूर्णपणे थंड होऊ द्या.

(know-how-to-avoid-milk-curdling-in-summer-article)

milk
राजस्थानी खस्ता पराठा करणं सहज शक्य; जाणून घ्या कृती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com