टेस्टी आणि हेल्दी 'ब्रोकोली सूप' करा घरीच; जाणून घ्या रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रोकोली सूप

टेस्टी आणि हेल्दी 'ब्रोकोली सूप' करा घरीच; जाणून घ्या रेसिपी

औरंगाबाद: उन्हाळ्यामध्ये तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेच्या या काळात हलकं फुलकं अन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जर हलकं फुलकं अन्न आणि ते चवदार असेल तर त्याची मजाच वेगळी असते. यामुळे या काळात ब्रोकोली सूप एक बेस्ट ऑप्शन आहे. ब्रोकोलीत आपल्या शरीराला गरजेचे असणारे अनेक पोषकद्रव्ये असतात. तसेच ब्रोकोलीत असणारा कॅरेटेनॉइड्स ल्यूटीन हे हृदयविकारासाठी चांगले असल्याचेही सांगितले जाते. यासोबतच कर्करोग आणि तणाव कमी होण्यासही या सूपची मदत होते.

ब्रोकोली सूप

ब्रोकोली सूप

शरीरातील प्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठीही ब्रोकोली सूप फायद्याचे ठरते. तसेच गरोदर महिलांनाही याचे सेवन फायदेशीर असल्याचे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया ब्रोकोली सूपची रेसिपी-

ब्रोकोली सूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-

ब्रोकोली- २५० ग्रॅम

कांदा- १ बारीक कापलेला

लसून- दोन फोडी बारीक कापलेला

मिक्स्ड हर्ब- १/४ चमचा

जायफळ पावडर- चिमुटभर

दूध आणि साय- २ कप

मैदा- २ चमचे

मध- २ चमचे

मिरपूड- स्वादानूसार

मीठ- स्वादानूसार

ब्रोकोली सूप

ब्रोकोली सूप

कृती-

  1. पहिल्यांदा ब्रोकोलीचे लहान तुकडे करून ते स्वच्छ धुवून घ्या.

  2. एका भांड्यात दोन कप पाणी आणि थोडे मीठ टाकून ते गरम करायला सोडा. नंतर त्यात तुकडे केलेले ब्रोकोली टाका. ३० सेकंदानंतर ब्रोकोली पाण्याच्या बाहेर काढा.

  3. तर दुसरीकडे गॅसवर एक भाडे ठेवा. बारीक कापलेला कांदा आणि लसीन त्याबरोबर मध टाका. कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या.

  4. नंतर त्यात मैदा आणि पाणी टाका आणि दोन मिनीट लहान गॅस ठेवा. नंतर मऊ पडलेली ब्रोकोली यात टाका. नंतर १० मिनीटे हे मिश्रण शिजवा.

  5. त्यानंतर सूपचे हे मिश्रण आणि गरम दूध एकत्र करून एकजीव करून घ्या. नंतर ते मिश्रण लहान गॅस सोडून गरम करा. त्यानंतर त्या सूपमध्ये मिक्स हर्ब टाका. जेंव्हा सूप गरम होईल तेंव्हा यात मीठ, मिरपूड आणि जायफळ पावडर टाका.

  6. त्यानंतर तुमचे ब्रोकोली सूप तयार होईल. ते तुम्ही सर्व करू शकता.

टॅग्स :recipe