

निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये सर्व भाज्या, धान्यांसेबतच सर्व प्रकारच्या फळांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. अशी अनेक फळं आपणं नियमित खास असतो. मात्र काही फळं अशी आहेत ज्यांच थेट सेवन केलं जातं नसलं तरी त्या फळांचे आरोग्यासाठी मोठे फायदे आहेत. Know Various benefits of Kokam fruits health tips Marathi
यापैकीच एक म्हणजेत कोकम Kokam Fruit. कोकम हे मुळात एक फळ असलं तर कोकम थेट खाण्याऐवजी कोकमावर नैसर्गिक प्रक्रिया करून ते साठवलं जातं त्यानंतर त्याचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो. तसंच उन्हाळ्यात Summer मोठ्या प्रमाणात कोकम सरबताचं Kokam syrup सेवन केलं जातं.
खरं तर कोकम म्हंटलं की अनेकांना उन्हाळा आणि थंडगार कोकम सरबत आठवतं. मात्र उन्हाळ्याशिवाय देखील तुम्ही कोकमाचा आहारामध्ये समावेश करू शकता. स्वयंपाकामध्ये तसचं चटणीमध्ये किंवा सोलकढीच्या माध्यमातून तुम्ही वर्षभर कधीही कोकमाचं सेवन करू शकता. कारण सामान्य वाटणाऱ्या या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
कोकमामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. कोकमात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन सी तसचं फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, आयरन, पोटऍशियम, मॅग्नेशियम आणि झिंक आढळतं. कोकममध्ये अॅसिटिक अॅसिड आणि हायड्रॉक्सी सायट्रिक अॅसिड देखील उलब्ध असतात.
हे देखिल वाचा-
कोकमचे आरोग्यासाठी फायदे-
रोगप्रतिकार शक्ती वाढते- कोकममध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-बॅक्टोरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इंफेक्शन किंवा आजारांचा धोका दूर होतो. कोकमाच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या अॅलर्जी तसचं इतर समस्या दूर होण्यास मदत होते.
निरोगी यकृतासाठी फायदेशीर- कोकममध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे लिवर म्हणजेच यकृत निरोगी राहण्यास मदत होते. कोकममध्ये असलेले गुणधर्म यकृतामध्ये लिपिड पेरॉक्सिडेशन रोखण्याचे काम करतात. यासाठीच यकृतासंबधी समस्या असलेल्या रुग्णांनी कोकमचा आहाराच समावेश करावा.
किडनीसाठी लाभकारी- किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी कोकमाचं सेवन करणं उपयुक्त ठरतं. किडनीस्टोनची समस्या असलेल्या रुग्णांनी कोकमचं योग्य प्रमाण सेवन केल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.
हृदय निरोगी राहण्यास मदत- कोकममध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड शुगरची समस्या कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही केवळ उन्हाळ्यात कोकम सरबताच सेवन न करता नियमितपणे स्वयंपाकामध्ये कोकमाचा समावेश करू शकता.
मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत- कोकममध्ये मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी गरजेचं असलेले घटक आढळतात. कोकममधील अँटीऑक्सिडंट्समुळे इन्सुलिन नियंत्रणात राहून रक्तातील ग्लुकोजचं प्रमाणा कमी होतं.
मानसिक स्वास्थ चांगलं राखण्यासाठी- कोकम हे आपलं मानसिक स्वास्थ चांगलं राखण्यासाठी कोकम उपयुक्त ठरतं. कोकममध्ये फ्लॅनोनॉयड्स सारखी पोषक तत्व उपलब्ध असतात. यामुळे मेंदूतील सेरोटोनिन पातळी वाढण्यास मदत होते.
नियमितपणे कोकमाचं सेवन केल्याने चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.
याशिवाय अनेक स्किन केअर प्राॅडक्टमध्ये कोकमच्या तेलाचा तसंच कोकमाच्या तत्वांचा वापर केला जातो. खास करून अनेक अँटीएजिंग क्रिम आणि अँटीएजिंग ट्रिटमेंटसाठी कोकमच्या त्तत्वांचा वापर उपयुक्त ठरतो. तसंच कोकम हे पित्तशामक असल्याने पित्त, अॅसिडिटीची समस्या दूर होते.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.