Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीला घरी दही लावताय मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

दही हे बालकृष्णाला खूप प्रिय असल्याचं मानलं जातं. दही खाणे आरोग्यासाठी उत्तम असते कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूपच फायदेशीर ठरतात.
Curd
Curd Esakal

अवघ्या काही दिवसांवर आलेला गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्णजन्मोत्सव सण देशभर आनंदात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण दिवसभर उपवास करतात आणि श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रात्री उपवास सोडतात. यंदा 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा होत असून, यासाठी बाजार सजला आहे. या दिवशी बाळकृष्णाच्या नैवेद्यासाठी घरी दही लावताय कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जेणेकरून घट्ट चवदार दही घरच्या घरी तयार होईल याचीच सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

दही हे बालकृष्णाला खूप प्रिय असल्याचं मानलं जातं. दही खाणे आरोग्यासाठी उत्तम असते कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूपच फायदेशीर ठरतात. तसेच हे पचनशक्तीसाठी देखील चांगले असल्याचे मानले जाते. म्हणूनच बरेचसे लोक याचा जेवणात वापर करतात. दह्याचा उपयोग फक्त खाण्यासाठीच नाही, तर अनेक प्रकारच्या पाककृती, त्वचा आणि केसांच्या मजबुतीसाठी केला जातो. म्हणून आपल्याला बहुतांश घरात दही पाहायला मिळते.

आता पाहू या घट्ट आणि चवदार दही बनवण्याच्या सोप्या टिप्स...

घरगुती आणि नैसर्गिकरित्या गोठवलेले दही हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही हे चांगले बॅक्टेरिया असलेले नैसर्गिक प्रोबायोटिक आहे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.

Curd
Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमीला का फोडली जाते दही-हंडी?

सर्वप्रथम दह्यासाठी दूध चांगले उकळवा.

घट्ट दही बनवण्यासाठी, फक्त दूध गरम करणे पुरेसे नाही, तर घट्ट दही बनवण्यासाठी, तुम्हाला दूध मोठ्या आचेवर गरम करावे लागेल आणि मंद आचेवर सुमारे 20 मिनिटे ठेवून त्याला आटवावे लागेल. मंद आचेवर दूध शिजवल्याने दुधातील ओलावा नाहीसा होतो आणि दुध किंचित घट्ट होते, त्यामुळे दही घट्ट आणि गोड होते.

विरजनासाठी जुने दही योग्य प्रमाणात टाका.

बहुतेक लोक घरात असलेले जुने दही, ताक किंवा लोण्यापासून नवीन दही बनवतात. दही सेट करण्यासाठी जुन्या दह्याचे प्रमाण किती आहे, याची कल्पना असणे आवश्यक आहे. जुने दही दुधात प्रमाणानुसार मिसळा.

दही सेट होण्यासाठी पुरेपूर वेळ द्या.

दूध जास्त वेळ सेट होण्यासाठी सोडल्यास दही अनेकदा आंबट होऊ शकते, म्हणून दही सेट होण्यासाठी फक्त 7 तास द्या.

दह्यात असलेले पाणी चाळणीने गाळून घ्यावे.

दही बराच वेळ गोठल्यास त्याच्या वर पाणी दिसू शकते. असे झाल्यावर, तुम्ही सूती कापडाने दही गाळून पाणी वेगळे करू शकता. असे केल्याने दही सहज घट्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com