

Lucknow UNESCO creative city for gastronomy
sakal
युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत (क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क) समृद्ध आणि विविध खाद्य परंपरेसाठी लखनौला स्थान मिळाले आहे. युनेस्कोच्या महासंचालिका ऑड्री अझुले यांनी जगभरातील १०० हून अधिक देशांतील ४०८ शहरांचा समावेश असलेल्या या नेटवर्कमध्ये ५८ नवीन शहरांची भर घातल्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला गॅस्ट्रॉनॉमी (खाद्यसंस्कृती) या श्रेणीत मान्यता मिळाली आहे.