ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : भात : कणदार, कसदार! 

मधुरा पेठे
Friday, 19 February 2021

जगभरात भात हा जेवणातील मुख्य पदार्थ आहे. तांदळाच्या साधारण ४०,००० पेक्षा जास्त जाती आहेत आणि जगातील ९० टक्के तांदूळ आशिया खंडातच खाल्ला जातो. 

जगभरात भात हा जेवणातील मुख्य पदार्थ आहे. तांदळाच्या साधारण ४०,००० पेक्षा जास्त जाती आहेत आणि जगातील ९० टक्के तांदूळ आशिया खंडातच खाल्ला जातो. 

आपण आज जो तांदूळ खातो त्याचे मूळ आणि कूळ हिमालयाच्या कुशीत मिळते. तिथे तयार झालेले तांदळाचे पीक हळूहळू बदल होत आजच्या स्वरूपात आले. भारतात येणारे व्यापारी, फिरस्ते, सैनिक यांच्यामार्फत जगभर पोचले आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनले. 

जपानमध्ये साधारण ३ हजार वर्षांचा तांदळाचा इतिहास आहे. त्यांच्या संस्कृतीत भात वाया घालवणे निषिद्ध आहे. जापनीज भाषेत जेवणाकरता ‘गोहान’ असा शब्द आहे, गोहान म्हणजे भात. आसागोहान, हिरूगोहान, बानगोहान म्हणजे सकाळ, दुपार संध्याकाळचा भात/जेवण. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जपानी भाषेत प्रत्येक जेवणाकरता जे शब्द आहेत ते शुद्ध आसागोहान, हिरू गोहान, बानगोहान असे आहेत. गोहान म्हणजे भात- सकाळचा दुपारचा नि संध्याकाळचा भात. थायलंडमधील पुराणकथेत श्रीविष्णूने इंद्रदेवाला गळ घातली, की हे स्वर्गीय अन्न- तांदूळ कसे पिकवायचे हे मानवाला जाऊन शिकव म्हणजे तेसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतील.

आपल्या गणपती बाप्पालासुद्धा तांदूळ पिठी नि नारळाचा मोदक आवडतो, खिचडी, तांदूळ खिरीचा उल्लेख आपल्या पुराणात येतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा हा सर्वांचा आवडता भात आणि त्याच्या असंख्य रेसिपीज आज जगभरात आहेत. भारतात डाळ-भात सर्वांत जास्त पसंत केला जातो, तर जपान चीनसह आशियायी देशांत स्टीम भाताला सर्वात जास्त पसंती आहे. अर्थात त्यासोबत अनेक पदार्थ खाल्ले जातात, जसे की भाजलेला/तळलेला मासा, अंडे, सॉसमध्ये परतलेला टोफू किंवा मांस इत्यादी. दक्षिण युरोपमध्ये तांदूळ, भाज्या, मांस, मासे एकत्र घालून घट्ट सूप तयार केले जाते. जपानमध्ये सुशी म्हणजेच समुद्री वनस्पतीचा कागद वापरून भाताचा रोल करतात, किंवा गरम भात कच्चे अंडे घालून ब्रेकफास्टमध्ये खाल्ला जातो, सोबत मोची म्हणून भाताचा गोड पदार्थ तयार करतात. मिडल ईस्टमध्ये मांस, भाज्या, सुकामेवा घालून पुलाव आणि बिर्याणी तयार केली जाते, तर आफ्रिकेत तांदळाच्या उकडीचे मोठे गोळे मटणाच्या रश्श्यात सोडले जातात आणि ते नंतर एकत्र आवडीने खाल्ले जाते. पदार्थ एकच परंतु तो इतक्या नवनवीन पद्धतीने तयार केला जातो याचे अधिक कौतुक वाटते. 

पुलावबाबत एक आठवण सांगते. काही वर्षांपूर्वी दुबईत आम्ही इराणी रेस्टॉरंटमध्ये खास पुलाव ऑर्डर केला, वाटले दोघांपुरेसे येईल. परंतु तो पुलाव मात्र भल्यामोठ्या ट्रेमध्ये शिगोशीग भरून पाऊण किलो मटनासहित आला. त्यात भरपूर चवळी आणि शेपूची भाजी घातलेली होती. मटण स्टॉकमध्ये शिजवलेला, गरम मसाल्याचा हलका स्वाद आणि शेपूच्या चवीचा पुलाव एक आठवण देऊन गेला. 

भारतात मात्र व्हेज जेवणाला लोकांची पसंती जास्त असल्याने व्हेज पुलावमध्ये भरपूर व्हरायटी दिसून येते. व्हेज पुलाव, काश्मिरी, नवरत्न, शाही असे भरपूर ऑप्शन्स मिळतात.आज त्यातीलच माझ्या आईची एक खास रेसिपी बघूयात. 

शाही काजू-मटार पुलाव
साहित्य : पाव वाटी काजू तुकडा, पाव वाटी मनुके, १ वाटी वाफवलेले मटार, अर्धी वाटी पनीर बारीक तुकडे, ३ कप शिजवून थंड केलेला मोकळा बासमती भात, ४ टेबलस्पून तूप, पाव वाटी मावा किसून, मीठ, २ टीस्पून पिठी साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर 
फोडणीकरता : ७ मिरी, ५ लवंगा, ४ बडी वेलची, ६ हिरवी वेलची, २ मोठे तुकडे दालचिनी, पाव टीस्पून जिरे, ३ पान तेजपत्ता, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून. 

कृती -

  • भात शिजवताना मीठ आणि चमचाभर तेल टाकून मोकळा शिजवून थंड करून घ्या. मटार वाफवून घ्यावेत. 
  • फोडणीत प्रथम तूप घ्या. 
  • तूप तापले, की त्यात प्रथम मसाला नि मिरची टाका, थोडे परतले की मावा टाका, तो किंचित परतला की लगेच त्यात काजू मनुके आणि पनीर टाका. मिक्स करून वरून भात आणि मटार टाका. 
  • हलक्या हाताने वर-खाली करून त्यात पिठी साखर, मीठ आणि वेलची पावडर टाका. एक वाफ येऊ द्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhura Pethe Writes about Rice