Makar Sankranti : हृदयापासून ते त्वचेपर्यंत, तीळ खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sesame Seeds

Makar Sankranti : हृदयापासून ते त्वचेपर्यंत, तीळ खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहे काय?

Sesame Seed Benefits : मकर संक्रांतीच्या तोंडावर सगळीकडे तीळ गूळाचे लाडू बनवायला सुरूवात झाली आहे. अनेकांच्या घरी तर तीळ गूळाचे पदार्थ बनवूनही झाले असतील. मात्र परंपरेनुसार आपण संक्रांतील तीळ गूळाचे लाडू आणि बरेच पदार्थ बनवत असलो तरी मात्र अनेकांना तिळाचे नेमके काय फायदे आहे हे माहिती नाही.

गोडाधोडाचे पदार्थ किंवा डेझर्टचा स्वाद वाढवण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात. तिळाचे हृदयापासून त्वचेपर्यंत कुठकुठले फायदे आहेत, हे जाणून घेऊया.

तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही. दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

-तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात. याशिवायही तीळ बहुगुणी आहे. (makar Sankranti)

– त्वचा मुलायम राहण्यासाठीही तिळ उपयुक्त असतात. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

- ज्यांची त्वचा कोरडी पडते त्यांनी थोडे तीळ खाल्ल्यास त्यांना मोठा फायदा होईल.

- मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. (Winter)

हेही वाचा: Makar Sankranti 2023: मकरसंक्रांत स्पेशल खुशखुशीत तिळाच्या कोसल्या कशा तयार करायच्या?

- तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.

- ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्रपिंडाचे कोणतेही त्रास होणार नाही.

- दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

शिवाय संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या घालवण्यासाठी तीळ किंवा तिळाचे पदार्थ फायदेशीर ठरतात. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाचे पदार्थ केले जातात.