Makar Sankranti | मकर संक्रांतीला बनवा स्वादिष्ट गुळ तिळाचे लाडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gul Til Ladoo

मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.

मकर संक्रांतीला बनवा स्वादिष्ट गुळ तिळाचे लाडू

मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांती अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवसात हिवाळा (Winter) संपतो आणि उन्हाळ्याची सुरूवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात, परंतु खिचडी आणि तिळाचे लाडू (Til Ladoo) यांचे महत्त्व वेगळे मानले जाते.

हेही वाचा: यंदा डिंकाचे लाडू होताहेत कडू! सुकामेव्याच्या दरात वाढ

गुळापासून बनवलेले तिळाचे लाडू (Til Ladoo) विशेषतः हिवाळ्यात मकर संक्रांती दिवशी बनवले जातात. तिळाचे लाडू बनवणे खूप सोपे आहे. या लाडूंमध्ये गुळाचा चांगला गुणधर्म आहे जो हिवाळ्यात थंडीपासून तुमचे रक्षण करण्यास देखील मदत करू शकतो. चला तर मग गुळ तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य

- गूळ, तीळ, तूप, वेलची पावडर, बदाम, काजू

हेही वाचा: थंडीच्या दिवसांत तिळाचे लाडू खा अन् तंदुरुस्त रहा

कृती

- हे लाडू बनवण्यासाठी प्रथम तुम्हाला तीळ कढईत भाजून घ्यावे लागतील.

- नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून गरम करा.

- यानंतर गूळ घालून पूर्णपणे वितळू द्या. गॅस मंद आचेवर करा.

- गूळ वितळल्यानंतर त्यात तीळ, वेलची पूड, बदाम आणि काजू घालून मिक्स करा. आता गॅस बंद करा.

- मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने ग्रीस करून लाडू बनवून सर्व्ह करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top