

Sakal
आजकाल कॅफेमध्ये मिळणारा कुरकुरीत आणि चीजने भरलेला ग्रिल सँडविच खायला सर्वांनाच आवडते. पण प्रत्येक वेळी बाहेर जाऊन खर्च करणं शक्य नसतं. म्हणूनच आता घरच्या घरीच, तेही अगदी साध्या तव्यावर, कॅफेसारखा परफेक्ट ग्रिल सँडविच बनवता येणार आहे. या रेसिपीसाठी ना महागडा ग्रिलर लागतो, ना ओव्हनची गरज भासते. फक्त घरात सहज उपलब्ध असलेले साहित्य, एक तवा आणि ‘ही’ एक सोपी ट्रिक वापरली की तुमचा सँडविच होईल अगदी कॅफेस्टाइल. बाहेरून खमंग आणि आतून सॉफ्ट, भाज्यांनी आणि चीजने भरलेला हा सँडविच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. सकाळचा नाश्ता असो, संध्याकाळचा चहा असो किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी काही झटपट बनवायचं असेल, तेव्हा हा ग्रिल सँडविच परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया कॅफेसारखा ग्रिल सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.