Easy High-Protein Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि कुरकुरीत, २० मिनिटांत तयार होणारा हरभऱ्याच्या पिठाचा पराठा; लगेच रेसिपी लिहून घ्या

Chickpea Flour Cheese Paratha Recipe: फक्त २० मिनिटांत बनवा कुरकुरीत आणि प्रथिनंयुक्त हरभऱ्याच्या पिठाचा पराठा – स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्त्यासाठी परफेक्ट
Chikpea Flour Cheese Paratha
Chikpea Flour Cheese Parathasakal
Updated on

Chickpea Flour Cheese Parathas : सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या पदार्थांऐवजी काहीतरी वेगळं आणि झटपट बनणारं हवंय? मग खास मराठमोळ्या चवीने भरलेले ‘हरभऱ्याच्या पिठाचे चीज पराठे’ एकदा नक्की ट्राय करा!नेहमीच्या पराठ्यांना पौष्टिक ट्विस्ट देत, प्रथिनंयुक्त हरभऱ्याच्या पिठाचा वापर करून तयार होणारी ही रेसिपी केवळ स्वादिष्टच नाही, तर हेल्दीही आहे. चीजचा सॉफ्ट आणि क्रिमी फ्लेवर या पराठ्याला अप्रतिम चव देतो, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.

जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी नवीन आणि चविष्ट खायचं असेल, तर ही हटके आणि सोपी रेसिपी नक्की करून पहा!

साहित्य

पराठ्यासाठी:

  • १ कप गव्हाचं पीठ

  • ½ कप हरभऱ्याचं पीठ

  • १ टेबलस्पून तेल

  • चवीनुसार मीठ

  • ½ टीस्पून जिरे

  • पाणी (गरजेप्रमाणे मळण्यासाठी)

सारणासाठी:

  • ½ कप किसलेलं चीज

  • १ टीस्पून हिरवी मिरची आणि आलं वाटलेलं

  • १ टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली

  • ½ टीस्पून लाल तिखट

  • ½ टीस्पून गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

Chikpea Flour Cheese Paratha
Father's Day Special: फादर्स डे ला बाबांसाठी घरच्या घरी बनवा खास 'क्रिमी बटरस्कॉच मूस', लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात गव्हाचं आणि हरभऱ्याचं पीठ घ्या, त्यात जिरे, मीठ आणि थोडंसं तेल घालून छान मिसळा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसर कणिक मळा आणि १५ मिनिटं झाकून ठेवा. तोपर्यंत, सारण तयार करण्यासाठी एका भांड्यात किसलेलं चीज, मिरची-आलं पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व घटक चांगले एकजीव करा. आता कणकेचा लहान गोळा घेऊन हलकासा लाटून त्यात तयार सारण भरा आणि गोळा बंद करून पुन्हा हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून खमंग भाजा. शेवटी, गरमागरम पराठे टोमॅटो केचप किंवा दहीसोबत सर्व्ह करा आणि कुरकुरीत, चविष्ट नाश्त्याचा आनंद घ्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com