बनवा भरलेल्या ढेमशांची लज्जदार भाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरलेल्या ढेमशांची भाजी

तुम्हाला वेगळ्या भाजीची चव घ्यायची आहे. तर बनवा ढेमशांपासून भाजी आणि खाण्याचा आनंद घ्या...

बनवा भरलेल्या ढेमशांची लज्जदार भाजी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भरलेली वांगी (Brinjal) असो किंवा कारले त्याची चवच निराळी असते. मग ते डाळ(Pulse) असो किंवा चपाती. यापेक्षा वेगळी भरलेल्या टेमशांच्या भाजीची चव घ्यायला हरकत नाही. आम्ही तुम्हाला भरलेल्या ढेमशांच्या भाजीविषयी सांगणार आहोत. (Make Indian Baby Pumpkin Recipe Simple Way)

साहित्य

- ढेमसे - २५० ग्रॅम

- लसूण - १०० ग्रॅम

- कांदा - दोन मोठ्या आकाराचे

- धने - चार चमचे

- जीरा - १ चमचा

- हळदी पावडर - १/२ छोटे चमचे

- आमचूर पावड - एक छोटा चमचा

- कलोंजी - १/२ चमचा

- सौंफ - १/२ चमचा

- साबूत लाल मिरची - दोन

- तेल - आवश्यकतेनुसार

- मीठ - चवीनुसार

- दही - १ चमचा

कृती

- जीरा, धने, कलोंजी, सौंफ आणि लाल मिरची भाजून घ्या.

- ढेमसे सोलून घ्या आणि प्रत्येक ढेमशाच्या मधोमध चाकूने बिया काढून घ्या.

- लसूण आणि कांदा चांगल्या प्रकारे सोलून पेस्ट तयार करुन घ्या. ती चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

- त्यात सुके मसाले टाका आणि अमचूर पावडर टाका. ढेमशांमध्ये मसाला चांगल्या प्रकारे भरा.

- एका कढईत तेल टाकून एकेक करुन सर्व ढेमसे त्यात टाका. आता शिजण्यासाठी ठेवून द्या.

- जेव्हा ढेमसे शिजलेले दिसतील तेव्हा त्यात दही टाका. गरमागरम ढेमसे डाळभाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाण्यास तयार आहे.

loading image
go to top