esakal | Malabar Fish Curry Recipe : घरच्या घरी बनवा तेही अगदी झटपट
sakal

बोलून बातमी शोधा

Make instant Malabar Fish Curry Recipe at home

हॉटेलसारखी फिश करी घरच्या घरी बनवू शकता आणि आपल्या कुटूंबासोबत खाण्याचा आनंद घेऊ शकता. मलबार फिश करी एक अप्रतिम डिश आहे. 

Malabar Fish Curry Recipe : घरच्या घरी बनवा तेही अगदी झटपट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : काहींना रोजचं साधं जेवण खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा काही तरी वेगळं तसेच व्हेज-नॉनव्हेज खाण्याची तल्लफ येते. त्यावेळी कुणी मटण, कुणी चिकन, कुणी बिर्याणी तर कुणी फिश खाण्याला पसंती देतात. त्यात अनेकांना फिश आवडतंच असेल. फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे. चवीला सुध्दा मस्त असते. अशीच एक लिप-स्मॅकिंग डिश म्हणजे मलबार फिश करी.

रेस्टॉरंटसारखी घरी बनवा झटपट तवा पराठा रेसिपी 

या रेसिपीसाठी कोणत्याही प्रकारचे मासे तुम्ही वापरू शकता. हॉटेलसारखी फिश करी घरच्या घरी बनवू शकता आणि आपल्या कुटूंबासोबत खाण्याचा आनंद घेऊ शकता. मलबार फिश करी एक अप्रतिम डिश आहे. 

साहित्य : मासे, लाल तिखट, कांदा, नारळ दूध, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ

कृती : सुरवातीला गॅसवर एका पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाका. त्यात मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून कांदा, लसून, अद्रक, टोमॅटो, खोबरे, मिरे, विलायची, लवंग फिरवून घ्या. तयार कोथिंबीरचे पेस्ट टाकून चांगले परतून घ्या. यात नारळाचे दूध घाला.

याशिवाय तुम्हाला भाजीची ग्रेव्ही जितकी हवी आहे तितके पाणी टाका. यावर झाकण ठेवून ते उकळून घ्या. उकळलेल्या करीमध्ये मासे स्वच्छ धुवून त्यात चवीनुसार मीठ मिसळा. यानंतर १० मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घ्या. शेवटी चिंचेचा कोळ घाला आणि वरून  कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

संपादन : सुस्मिता वडतिले 

loading image
go to top