घरीच झटपट बनवा कांद्याची मठरी; नाश्तासाठी आहे एकदम परफेक्ट

Make instant onion chatni at home Perfect for breakfast kolhapur news
Make instant onion chatni at home Perfect for breakfast kolhapur news

कोल्हापूर : सकाळी-सकाळी चहासोबत काय खायचं हा प्रश्न अनेकवेळा पडतो. चहा आणि नाश्ताचे अने शाैकीन असतात. आज तुम्हाला आम्ही अशा एका पदार्थाची रेसीपी सांगणार आहोत की तो पदार्थ एकदा बनविला की अनेक दिवस टिकती व तुम्ही रोज नाश्ता करू शकाल. पालक आणि मेथी फ्लेवरची मठरी तुम्ही खाल्ली असेल पण आज आपण पाहणार आहोत कांद्याची मठरी. फक्त तीस मिनिटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. 
 
साहित्य

कापलेका कांदा, दीड कप मैदा, दोन चमचे आटा, दोन चमचे बेसन, दोन चमचे सोजी, एक छोटा चमचा जीरे, एक ते चार चमचे अजवाईन, एक चुटकी हींग, दोन चमचे सुकलेल्या मेथीची पाने, मीठ चवीनुसार, तीन चमचे गरम तूप, तळण्यासाठी तेल

कृती

सर्व प्रथम तुम्हाला पिठ मळून घ्यावे लागेल. इतर मठरीसारखेच या पिठालाही मळल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्या. त्यानंतर त्यामध्ये मैदा, सोजी, बेसस आणि मळलेले पिठ एकत्र करा. मैदा सोडून इतर सर्व घटक सम प्रमाणात घ्या.  त्यानंतर आता जीरा, अजवाईन, हिंग, सुखविलेली मेथी, मीठ, कांदा आणि तूप चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तूप थोडेसे गरम करून घ्या. आता हे सर्व थोडे कडक मळून घ्या आणि एका कापडात झाकून ठेवा.  आता या मळलेल्या पिठाची सांबसडक गोळी करा आणि मठरीचा आकार देऊन कापून घ्या. मठरीमध्ये फोर्कच्या मदतीने थोडे-थोडे छेद करा. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये डीप फ्राय करून घ्या. पीस गोल्डन ब्राऊन रंगाचे होत नाहीत तो तोपर्यंत गॅस चालूच राहू द्या. त्यानंतर पिस काढून बटर पेपरवर थंड होण्यासाठी ठेवा. आता एका हवेशीर डब्यात ठेवून द्या आणि रोज सकाळी चहासोबत आस्वाद घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com