esakal | उन्हाळ्यात तयार करा उसाच्या रसापासून खीर; ही आहे पद्धत

बोलून बातमी शोधा

Make kheer from sugarcane juice in summer Nagpur news

उसाची खीर ही अप्रतिम रेसिपी आहे. यासाठी बऱ्याच घटकांची आवश्यकता नसते. काही मूलभूत घटकांसह ती तयार करता येते. उसाबरोबर तांदळाचा वापर केला जातो. तांदूळ आणि उसाचे मिश्रण या रेसिपीला एक उत्तम गुळगुळीत चव देते. या खीरमुळे तुम्हाला त्वरित भरपूर ऊर्जा मिळते आणि तुम्हाला स्फूर्ती जाणवते. 

उन्हाळ्यात तयार करा उसाच्या रसापासून खीर; ही आहे पद्धत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : उन्हाळा आला की आठवण येते थंड पेयाची. भर उन्हात थंड पेय पिल्यानंतर मिळणारा आनंद वेगळाच. रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाड्या पाहून मन प्रसन्न होते. दर उन्ह्यात आपण उसाचा रस पित असतो. मात्र, तुम्ही कधी उसाच्या रसापासून तयार केलेली खीर खाल्ला आहे का? तुमचे उत्तर नाहीच असेल? चला तर जाणून घेऊया कशी तयार करायची उसाच्या रसाची खीर...

उसाची खीर ही एक आगळ्या वेगळ्या प्रकारची स्वीट डीश आहे. ही बनवण्यासाठी आपल्याला साखर किंवा गुळाची गरज भासत नाही. उसाच्या रसात असणारा नैसर्गिक गोडवा या डिशला स्वादिष्ट बनवण्यास पुरेसा ठरतो. खूप कमी सामग्रीमध्ये व झटपट अशा स्वीट रेसिपीच्या शोधात जे लोक असतील त्यांच्यासाठी उसाची खीर हा सर्वोत्तम पर्याय आहे. मऊशार भातासोबत इतर सामग्रीची चव उतरलेल्या या खिरीची चव चाखल्यावर तुम्ही इतर स्वीट डिश विसरून जाल. 

उसाची खीर ही अप्रतिम रेसिपी आहे. यासाठी बऱ्याच घटकांची आवश्यकता नसते. काही मूलभूत घटकांसह ती तयार करता येते. उसाबरोबर तांदळाचा वापर केला जातो. तांदूळ आणि उसाचे मिश्रण या रेसिपीला एक उत्तम गुळगुळीत चव देते. या खीरमुळे तुम्हाला त्वरित भरपूर ऊर्जा मिळते आणि तुम्हाला स्फूर्ती जाणवते. 

लागणारी सामग्री

पाचशे मीली लीटर उसाचा रस, 1.4 कप तांदूळ, दोन चमचे तूप, काजू व पाच चमचे दूध

अशी करा तयार

एका कढईत तूप गरम करा. यानंतर त्यात काजू गोल्डन-ब्राऊन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. काजू भाजल्यानंतर काढून घ्या. आता कढईत उसाचा रस टाकून उकळवून घ्या. रस उकळल्यानंतर दूध मिक्स करा. यानंतर या मिश्रणात तांदूळ टाका. तांदूळ मऊशार होईपर्यंत १५ मिनिटे खीर चांगली शिजवून घ्या. यानंतर ड्राय फ्रुट्स घाला आणि मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. तयार झाली आहे आपली चविष्ट उसाच्या रसाची खीर! जेवणानंतर डेसर्ट म्हणून तुम्ही या खीरचा आस्वाद घेऊ शकता.