Mango Recipes: आंब्यापासून बनवा 'हे' 4 चटकमटक पदार्थ

Mango Recipes: साध्या आंब्यापासून तयार होणाऱ्या पाककृती पाहल्या तरी थक्क व्हायला होते. पण गंमत म्हणजे, या सर्व रेसिपीज शिकणे व तयार करणे अगदी सोपे आहे.
Mango Recipes:
Mango Recipes: Sakal

नितिशा स्मार्त

भारतीय संस्कृतीमध्ये असलेले वैविध्य म्हणजे इथले फूड कल्चर. प्रत्येक पदार्थांच्या व्हेरिएशनमुळे एकाच पदार्थाचे वैविध्यपूर्ण प्रकार पहायला मिळतात. याच वैशिष्ट्यामुळे भारतीय पाककृती संपूर्ण जगात वेगळ्या ठरतात. साध्या आंब्यापासून तयार होणाऱ्या पाककृती पाहल्या तरी थक्क व्हायला होते. पण गंमत म्हणजे, या सर्व रेसिपीज शिकणे व तयार करणे अगदी सोपे आहे. 

१. कैरीची डाळ

  • साहित्य

भिजवलेली हरभरा डाळ २ वाटी

वाटलेली हिरवी मिरची

किसलेल्या कैरी २

साखर चवीनुसार

मीठ

कोथंबीर फोडणीसाठी तेल

मोहरी हिंग थोडी हळद

  • कृती

हरबरा डाळ मिक्सरमध्ये भरड वाटावी. त्यात हिरवी मिरची ,कैरी ,मीठ ,साखर, कोथिंबीर सगळे एकत्र करावे. थोडावेळ मुरू द्यावे. वरून फोडणी घालून परत चांगले मिक्स करावे. आंबट गोड चव आपल्याला आवडेल तशी अँडजस्ट करावी. फ्रीझमध्ये ठेऊन थंड किंवा तशीच खाऊ शकता. हा पदार्थ अत्यंत रुचकर लागतो.आवडत असल्यास थोडे ओले खोबरे  घालू शकता. पण डाळ उरली तर खराब होऊ शकते. हा पदार्थ थोडा तिखट जास्त चांगला लागतो.

२. कैरीची चटणी

  • साहित्य

१ वाटी कैरीचा कीस

आवडीनुसार साखर किंवा गूळ

एक कच्चा कांदा

२ हिरव्या मिरच्या

थोडी कोथिंबीर

३-४  कडीपत्याची पाने

मीठ

  • कृती

सगळे बारीक वाटावे. हवे तसे थोडे पाणी घालावे.आंबट चटणी आवडत असेल तर साखर नाही घातली तरी चालेल. पराठा, पुरी, पोळी किंवा रोजच्या ताटात तोंडी लावायला नेहमीच्या लोणच्यापेक्षा चटण्याशिवाय म्हणून हा खूप छान पर्याय आहे.

३. आम पन्ह

  • साहित्य

कुकरमध्ये उकडून घेतलेल्या कैऱ्या ३ ते ४

२ वाटी गूळ किंवा साखर

वेलची पूड

किंचित मीठ

३ ते ४ केशराच्या काड्या

पाणी

  • कृती

कैरीची सालं काढून गर काढून तो मिक्सरला फिरवावा. त्यात साखर किंवा बारीक केलेला गूळ घालावा, वेलची पूड घालावी केशराच्या काड्या घालाव्या आणि फ्रीझ मध्ये थंड करावे. पन्ह तयार करताना हे घट्टसर मिश्रण ग्लासभर पाण्यात २-३ चमचे घालावे मिक्स करून छान सरबतासारखे ढवळून घालावे. भरपूर बर्फ घालून प्यायला द्यावा. कैऱ्या खूप आंबट असतील तर गुळ किंवा साखर थोडी जास्तच घालावी.

४. मँगो फालुदा

  • साहित्य

आंब्याचा रस ३ वाटी

सब्जा पाण्यात भिजवून

मँगो आईस्क्रीम

एक ग्लास दूध

मिक्स ड्रायफ्रूटस

टूटी फ्रुटी

दुधात शिजवलेल्या शेवया

  • कृती

दुधात आंब्याचा रस साखर घालून मिक्सरवर फिरवून घ्यावे. मोठा काचेचा ग्लास घेऊन त्यात हे घोटलेले मिश्रण घालावे. त्यात थोडं सब्जा बी आणि शेवया घालाव्या. वर मँगो आईस्क्रीम घालून त्यावर भरपूर ड्रायफ्रूटस घालून एकदम थंड सर्व्ह करावे. अशाप्रकारे मँगो मस्तानीही करता येईल. फक्त सब्जा बी आणि शेवया घालू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com