Christmas Special : ख्रिसमससाठी स्पेशल प्लम केक, घरच्या घरी तयार करून पाहाच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

या सणांमध्ये बनवली जाणारी ट्रेडिशनल डिश म्हणजे प्लम केक. या सणामध्ये प्लम केक (Plum Cake) बनवलच जातं.

पुणे : ख्रिसमस हे नाव  ऐकलं आणि उच्चारलं तरी सर्वप्रथम डोळ्यांसमोर सांता क्लॉज,  चॉकलेट आणि केक येतं. लहान मुले या सणादिवशी खूप उत्साही  असतात. या सणांमध्ये बनवली जाणारी ट्रेडिशनल डिश म्हणजे प्लम केक. या सणामध्ये प्लम केक (Plum Cake) बनवलच जातं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण चॉकलेट आणि केकची वाट पहात असतात. हे केक सर्वांच्या आवडीचे असून केकला या दिवसात खूप मागणी मिळते. तर चला मग प्लम केक  कसे बनवलं जात ते जाणून घेऊयात.

हे ही वाचा : ख्रिसमस फेस्टविल घरी साजरा करताय? ट्राय सोप्या टिप्स 

साहित्य 

- अर्धा कप प्‍लम (मनुका) 
- एक चमचा लिंबू रस 
- एक चिमूट बेकिंग पावडर 
- एक वाटी मैदा 
- फेटलेली तीन अंडी 
- अर्धी वाटी लोणी / बटर 
- अर्धा कप साखर 

कृती -

प्रथम ओव्हनला ३२५ डिग्रीवर सेट करा. एका बाऊलमध्ये साखर आणि बटर मिक्स करून घ्या. दुसऱ्या बाऊलमध्ये अंडे आणि लिंबू रस एकत्र करून फेटून घ्या. त्यानंतर बटर मिक्स केलेल्या बाऊलमध्ये मैदा आणि बेकिंग पाउडर घाला. एका पॅनमध्ये बटर चांगले लावून घ्या आणि त्यात मैदा आणि बेकिंगचे मिश्रण पसरवा. यानंतर केकला ४५ मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅस किंवा कुकरमध्ये ही केक बेक करून शकता. ४५ मिनिटानंतर केक तयार होईल. या केकला बटर प्लमस्लाइट्सने सजवा आणि त्यानंतर ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहेरच्या सारखे प्लम केक घरात तयार करता येईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a special plum cake at home for Christmas