उन्हाचा पारा ४० अंशावर गेला; घरीच तयार करा या पाच प्रकारची लस्सी

Make these five types of lassi at home Nagpur news
Make these five types of lassi at home Nagpur news

नागपूर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पारा ४० अंशावर गेला आहे. यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. यावर नियंत्रण मिळवायचा असेल तर भर उन्हात घराबाहेर न निघण्याचा सल्ला देण्यात येत आहे. भर उन्हात तहान लागल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंतीकडे लक्ष जाते. थोडी लस्सी पिऊन आराम मिळतो. मात्र, आम्ही तुम्हाला घरच्या घरी वेगवेगळ्या लस्सी कशी तयार करायची हे सांगणार आहोत.

भारतीय उन्हाळी हंगाम सहन करणे सोपे नाही. उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या हंगामात लोक स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याव्यतिरिक्त शर्बत, आंबा शेक, लस्सी, ताक, जलजीरा, शिकंजी अशा कोल्ड ड्रिंक नागरिक पीत असतात. या पेयांमधील सर्वांत आकर्षक गोष्ट म्हणजे ते काही सेकंदात तयार असतात आणि त्यांचे सेवन केल्यावर आपल्याला खूप ताजेतवाने वाटते.

उन्हाळ्याच्या हंगामातील फळांव्यतिरिक्त, बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही काही मिनिटांत नवीन पेय तयार करू शकता. आम्ही तुमच्यासाठी अशा पाच उत्कृष्ट पेयांची यादी तयार केली आहे जी तुम्ही लवकरात लवकर घरी तयार करू शकता आणि घरी आलेल्या पाहुण्यांनाही देऊ शकता.

आंब्याची लस्सी

उन्हाळ्यात दिवसांत आपण आंबा आवडीने खातो. त्याचा रसही करीत असतो. मात्र, तुम्ही घरच्या घरी आंब्याची लस्सीही तयार करू शकता. ही लस्सी दहीने तयार केली जाते. आंबा आणि पुदीनाने ही लस्सी ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

रीफ्रेशिंग प्लम ड्रिंक

आलुबुखार जीवनसत्त्वे अ आणि बी २ आणि सीचं चांगलं स्रोत आहे. याचा वापर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता देण्यास उपयुक्त आहे. हे पेय तयार करण्यासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टी आवश्यक आहेत. फक्त मनुके, दूध आणि बर्फ आवश्यक आहेत.

आले-जिंजर रेसिपी

आले-जिंजर सूर्यप्रकाशामध्ये ताजेपणासाठी उत्तम असते. सफरचंदाचा रस, लिंबू, आले आणि काळी मिरीचा चव इतर पेयांसह याला वेगळं करते. हे तयार करणे खूप सोपे आहे.

स्ट्रॉबेरी लस्सी

स्टॉबेरी लस्सी तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरी, दूध, मध आणि केळीची गरज भासते.  या सर्व गोष्टी एकत्र करा आणि चांगल्या मिश्रित करा. न्याहारीमध्येही तुम्ही हे बनवून घेऊ शकता.

ग्रीन ॲपल लस्सी

ग्रीन ॲपल लस्सी ही एक रीफ्रेश करणार पेय आहे. ही लस्सी तयार करण्यासाठी हिरवे सफरचंद, लिंबू आणि पुदीनाची पाने लागतील. तुम्ही काही मिनिटांतच ही लस्सी तयार करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com