
Simple Dudhi Bhopla Recipe For Navratri Upvas: गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरु होते. अश्विन महिन्यातल्या नवरात्रीला जसे उपवास धरले जातात तसेच चैत्र नवरात्रीत देखील धरले जातात. उपासाच्या काळात असे पदार्थ खाणे महत्त्वाचे असते जे हलके असूनही पोषक आणि उर्जा देणारे असतील, जेणेकरून दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि थकवा जाणवणार नाही. म्हणूनच, आज आम्ही तुमच्यासाठी दुधी भोपळ्याच्या खिरीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही खीर केवळ हलकी आणि पचायला सोपी नाही, तर चवीलाही अप्रतिम आहे.