पाहुण्यांचं मन जिकायचंय मग जेवणात बनवा काजू मटर मखाना, जाणून घ्या Tasty Recipe

तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं नसेल आणि घरीच एखादी स्पेशल भाजी जेवणासाठी बनवायची असेल तर तुम्ही काजू Cashew मटर मखाना ही भाजी नक्की ट्राय करू शकता
काजू मटर मखाना
काजू मटर मखानाEsakal

नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा रोजचा घरच्या स्वयंपाकाच्या Cooking चवीपेक्षा काहीतर वेगळं खायची इच्छा झाली की आपल्यापैकी अनेकजण हॉटेल Hotel गाठतात. हॉटेलमधील चमचमीत जेवणाची चव तर प्रत्येकालाच आवडते. Marathi Food Tips Try Cashew Muttur Makhana Dish

मात्र जर तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं नसेल आणि घरीच एखादी स्पेशल भाजी जेवणासाठी बनवायची असेल तर तुम्ही काजू Cashew मटर मखाना ही भाजी नक्की ट्राय करू शकता.

हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि तितकीच हेल्दी काजू मटर मखाना तुम्ही घरी सहज बनवू शकता. एखाद्या स्पेशल दिवशी किंवा पाहुणे आल्यावर तुम्ही या भाजीचा बेत आखू शकता. काजू मटर मखानाची खास रेसिपी Recipe आम्ही तुम्हाला आजा सांगणार आहोत.

काजू मटर मखानासाठी लागणारं साहित्य

५० ग्राम काजू, १०० ग्रॅम मटर, एक वाटी मखाना

मसाल्यासाठी

एक कांदा, १ टोमॅटो, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण, जीरं, लाला मिरची पावडर, गरम मसाला, हिंग, धणे पावडर, 2 तेजपत्ता, २ वेलची, दालचिनीचा एक तुकडा, कसूरी मेथी एक चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, तेल .

कृती

-सर्वप्रथम एका कढईमध्ये एक चमचा तेल तापल्यावर त्यात मखाना टाकून ते मंद आचेवर ३-४ मिनिटांसाठी चांगले रोस्ट करून घ्या. हे मखाना बाजूला काढा

- याच कढईत अर्धे काजूही लालसर रोस्ट करून बाजुला काढा.

-याच कढईत थोडं तेल घेऊन घेऊन अर्धा चमचा जिरं, कांदा, टोमॅटो आणि उरलेले काजू थोडे रोस्ट करा. त्यानंतर मिक्सरच्या मदतीने या सर्वाची पेस्ट तयार करा.

- आता एका कढईमध्ये १ चमचा तेल तापल्यावर त्यात. अर्धा चमचा जीरं तडतडू द्या. त्यानंतर यात तेजपत्ता, दालचिनी आणि वेलची परतून घ्या.

- त्यानंतर फोडणीमध्ये चिरलेलं आलं आणि लसूण आणि हिंग टाका.

हे देखिल वाचा-

काजू मटर मखाना
Soaked Cashews : दूधात काजू भिजवून खाण्याचे आरोग्यदायी फायदे

- आता यात तयार केलेली पेस्ट टाका.

- या पेस्टमध्ये १ टी स्पून हळद, १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून वाटणं चांगलं शिजू द्या. २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवा.

- तयार मसाल्याला तेल सूटू लागण्यानंचर त्यात मटार टाका. थोडं पाणी टाकून झाकण ठेवून १०-१२ मिनिटांसाठी वाटाणा शिजू द्या.

- वटाणा शिजल्यानंतर यात परतलेले काजू आणि मखाना टाका. तसचं चमचाभर कसूरी मेथी टाकून २-३ मिनिटांसाठी शिजू द्या.

- यानंतर कोथींबीर टाकून गॅस बंद करा.

अशा प्रकारे काजू मटार मखानाची लज्जतदार भाजी तयार होईल. ही भाजी तुम्ही फुलके, पराठे किंवा जिरा राईससोबत वाढू शकता. अत्यंत क्रिमी, टेस्टी अशा या शाही भाजीची चव चाखल्यानंतर तुमच्या घरातले किंवा तुमच्या घरी आलेले पाहुणे नक्कीच खूश होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com