चिमुकल्यांसाठी खास हटके Dessert Recipe, एकदा तरी नक्की ट्राय करा

अनेकदा बाहेर गेल्यावर मुलं चॉकलेट, केक, पेस्ट्री Cake And Pastry किंवा इतर गोड पदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात. मात्र मुलांचे हे हट्ट तुम्ही घरच्या घरी पूर्ण करू शकता
चिमुकल्यांसाठी खास डेझर्ट रेसिपी
चिमुकल्यांसाठी खास डेझर्ट रेसिपीEsakal
Updated on

खरंतर गोड पदार्थ खाणं Sweets हे सर्वच वयोगटातील व्यक्तींना आवडतं. मात्र खास करून लहान मुलांसाठी गोड हा जास्त जिव्हाळ्याचा विषय असतो. मिठाई , चॉकलेट Chocolat, केक, आईस्क्रीम किंवा कोणताही गोड पदार्थ खाण्यासाठी त्यांना कोणत्याही निमित्ताची आवश्यकता नसते. गोड पदार्थ Sweet Dish दिसताच मुलांचा आनंद द्विगुणित होतो. Marathi Food Tips Unique Recipes for Children Sweet Desserts

अनेकदा बाहेर गेल्यावर मुलं चॉकलेट, केक, पेस्ट्री Cake And Pastry किंवा इतर गोड पदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात. मात्र मुलांचे हे हट्ट तुम्ही घरच्या घरी पूर्ण करू शकता. यासाठीच आम्ही तुम्हाला काही सोप्या डेझर्ट रेसिपी Dessert Recipe सांगणार आहोत. तुमच्या मुलांसाठी तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करू शकता.

मायक्रोव्हेव मग ब्राऊनी-

चॉकलेट हा अर्थातच लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ. यासाठी तुमच्याकडे जर मायक्रोव्हेव असेल तर तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये ही चॉकलेट ब्राऊनी बनवू शकता.

चॉकलेट ब्राऊनी तयार करण्यासाठी एका वाडग्यात ३ चमचे मैदा घ्या. त्यात १ चमचा साखर, १ चमचा कोका पावडर, चिमूटभर मीठ, पाव टीस्पून बेकिंग पावडर टाका.

सर्व कोरडे पदार्थ एकत्र करून त्यात पाव टीस्पून व्हॅनिला इसेंन्स टाका. तसचं त्यात २ चमचे तूप किंवा वितळलेलं बटर अॅड करा.

यात २-३ चमचे दूध टाका आणि मिश्रण एकजीव करा.

आता यात एक चमचा चॉकलेट चिप्स टाका.

एका कॉफी मगला आतून बटर लावा आणि त्यात हे सर्व मिश्रण ओता.

आता मायक्रोव्हेव मध्ये १ ते दीड मिनिटांसाठी मग ठेवा.

अशा प्रकारे मग चॉकलेट ब्राऊनी तयार होईल.

वरून किसलेलं चॉकलेट टाकून ही ब्राऊनी तुम्ही मुलांना देऊ शकता.

हे देखिल वाचा-

चिमुकल्यांसाठी खास डेझर्ट रेसिपी
Milk Bread Dessert : दहा मिनिटात तयार होतो मिल्क ब्रेड डेझर्ट; रेसिपी आहे एकदम सोपी अन् चवही न्यारी!

बनाना फोस्टर-

लहान मुलांच केळं हे सहसा आवडचं फळ असतं. याच केळ्यापासून बनाना फोस्टर हे एक टेस्टी डेझर्ट तुम्ही मुलांसाठी बनवू शकता. बनाना फोस्टरची रेसिपी देखील अगदी साधी आणि सोपी आहे.

बनाना फोस्टर बनवण्यासाठी तुम्हाला २-४ केळी लागतील.

एका पॅनमध्ये ३-४ चमचे बटर टाका. गॅस मंद आचेवर ठेवा

बटर वितळू लागल्यानंतर यात ३-४ चमचे ब्राऊन शुगर आणि १ टीस्पून दालचिनी पावडर टाका . साखर विरखळेपर्यंत मिश्रण ढवळत रहा.

त्यानंतर या मिश्रणामध्ये २ बारीक कुस्करलेले केळी टाका आणि मिश्रणात केळी चांगली मिक्स करा.

यावर जवळपास अर्धी वाटी पाणी टाकून ढवळत रहा.

५-७ मिनिटांसाठी मंद आचेवर केळी शिजू द्या. केळी साखरेच्या सॉसमध्ये चांगली एकजीव होणं गरजेचं आहे.

घट्ट मिश्रण तयार झाल्यानंतर यात आता इतर दोन केळ्यांचे उभ्या स्लाइस करून टाका. साधारण २ मिनिटांसाठी या स्लाईस सॉसमध्ये शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

अशा प्रकारे तयार बनाना फोस्टर तुम्ही वेनिला आयस्क्रिम सोबत सर्व्ह करू शकता. हा गोड पदार्थ तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल.

मँगो पारफे-

आंबा हे फळ कुणाला नाही आवडत. आंबा खाण्यापासून ते आंब्याचा मिल्क शेक तसचं आयस्क्रिम आणि मँगो फ्लेवरचे अनेक पदार्थ लहान मुलांना कायम आवडतात. यासाठीच तुम्ही मुलांसाठी मॅँगो पारफे काहीसं हटके डेझर्ट बनवू शकता.

यासाठी एका वाडग्यामध्ये ३-४ चमचे ग्रीक योगर्ट घ्या.यामध्ये ३-४ चमचे आंब्याचा गर टाका. दोन्ही साहित्य चांगल फेटून एकजीव करा.

त्यानंतर एका मोठ्या पसरट ग्लासमध्ये तळाला थोडं तयार केलेलं मॅँगो योगर्ट टाका. यावर एक थर ग्रॅनोला किंवा मुसली टाका.

पुन्हा यावर एक थर मॅंगो ग्रीक योगर्टचा टाका आणि पुन्हा मुसली टाका.

आता वर शेवटचा थर हा योगर्टचा असावा. यावर काही लहान कापलेले आंब्याचे तुकडे आणि ड्रायफ्रूटस् टाका.

हे तयार मॅंगो पारफे थंडगार मुलांना तुम्ही नाश्त्यामध्येही सर्व्ह करू शकता.

कोकोनट पॅनाकोटा

नारळाच्या दूधापासून तयार करण्यात आलेला हा पदार्थ चवीला उत्तम लागतोच शिवाय हा मुलांसाठी एक हेल्दी डेझर्टचा पर्याय आहे.

कोकोनट पॅनाकोटा तयार करण्यासाठी एका कढईत अर्धा कप नारळाचं दूध आणि अर्धा कप कोकोनट क्रिम तापवत ठेवा.

या दूधात पाव कप साखर टाकून चांगलं उकळू द्या. २-३ मिनिटांनी यामध्य १ चमचा अगर अगर पावडर टाका आणि चांगलं ढवळा आणि गॅस बंद करा.

आता हे मिश्रण छोट्या वाट्या किंवा ग्लासमध्ये ओता. अर्धा ग्लास भरेल इतकं मिश्रण ओता.

हे ग्लास फ्रिजमध्ये १ तासासाठी गार होण्यासाठी ठेवा.

आता हे कोकोनट पॅनाकोटा गार झालं असेल. यावर तुम्ही मिक्स फ्रूट जॅम किंवा मॅन्गो पल्प टाकून सर्व्ह करू शकता.

अशा काही हटके डेझर्टच्या रेपिसी तुम्ही मुलांसाठी घरच्या घरी ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com