Keshar Pista Falooda
Keshar Pista Faloodaesakal

Dessert Recipe: रविवार स्पेशल तयार करा हे टेस्टी डेझर्ट तेही घरच्या घरी...

अगदी आईसक्रीम नसेल खायचं तर केशर पिस्ता फालूदा तसा वाईट ऑप्शन नाहीये...
Published on

Keshar Pista Falooda: रविवार म्हटला की काहीना काही चमचमीत खायचं असतं, थंडी अजूनही कमी झाली नाहीये पण आपल्या आवडत्या आईसक्रीमची आठवण येत असेल ना? एखादा दिवस चिट डे तसा चालतो... अगदी आईसक्रीम नसेल खायचं तर केशर पिस्ता फालूदा तसा वाईट ऑप्शन नाहीये... शिवाय तुम्ही हा फालूदा थोडा नॉर्मल असतांनाही खाऊ शकतात.

Keshar Pista Falooda
Dessert For Winter : थंडीत डेझर्ट खावस वाटत आहे? मग खा पौष्टिक फालुदा

साहित्य:

२५० मिली दूध

१२-१५ केशर

२ चमचे सब्जा बिया

२ चमचे फालुदा शेव

८-१० पिस्ते बारीक चिरून

२ स्कूप केसर पिस्ता आईस्क्रीम

४ चमचे साखर

Keshar Pista Falooda
Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

कृती:

- सर्व प्रथम साखर आणि केशर घालून दूध उकळवा.

- नंतर दुधात पिस्ते टाकून गॅस बंद करून दूध थंड होऊ द्या.

- सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून १/२ तास ठेवा.

- फालुदा उकळून गाळून बाजूला ठेवा.

- सब्जाच्या बिया फुगल्या की पाणी काढून बाजूला ठेवा.

- दूध थंड झाल्यावर त्यात सब्जाच्या बिया आणि फालूदा शेव मिक्स करा.

- आता ग्लासमध्ये १/३ इतकं दूध भरा.

- नंतर १ स्कूप आईस्क्रीम टाका आणि केशरने सजवा आणि थंड सर्व्ह करा.

Keshar Pista Falooda
Winter Friendly Food : हिवाळ्यात बनवा गूळ भाताची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com