Misal Pav Recipe: रविवार स्पेशल नाश्त्याला बनवा  झणझणीत मिसळ पाव..

तुम्ही ही झणझणीत मिसळ पाव सकाळचा नाश्ता, संध्याकाळच्या स्नॅक्सपासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता.
Misal Pav Recipe
Misal Pav RecipeEsakal

Breakfast: मिसळ पाव ही बनवायला सोपी पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. यात विविध मसाले, कडधान्ये आणि फरसाण यांचा मोठ्या प्रमामात वापर केला जातो. बनवायला सोपी असल्याने अनेक घरात ती नाश्ता म्हणून खाल्ली जाते. प्रत्येक लहान मोठ्या शहरात मिसळ पाव मोठ्या चवीने खाल्ली जाते. मोठमोठे रेस्टॉरंट असो की छोटेखानी फूड स्टॉल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिसळ पाव सहज उपलब्ध होते. त्यामुळे झणझणीत मिसळ लोकही मोठ्या आवडीने खातात. आता भारतातील प्रत्येक शहरात या खाद्यपदार्थाची लोकप्रियता वाढत आहे. तुम्ही ही झणझणीत मिसळ पाव सकाळचा नाश्ता, संध्याकाळच्या स्नॅक्सपासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या रविवार स्पेशल नाश्त्याला  झणझणीत मिसळ कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी..

साहित्य

1) मटकी 

2) फरसाण

3) पाव

4) ओलं खोबरं (किसलेले)

5) दोन बारीक चिरलेले कांदे 

6) एक बारीक चिरलेला टोमॅटो

7) आले 

8) लसूण पाकळ्या

9) कढीपत्ता

10) कोथिंबीर 

11) लिंबू

12) किंचितसा गुळ

13) काश्मिरी लाल तिखट

14) धणे पावडर

15) गरम मसाला

16) हळद

17) तेल

18) मोहरी

19) जिरे

20) मीठ

Misal Pav Recipe
Winter Recipe: हेल्दी गाजर फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे तयार करायचे?

कृती:

सर्वप्रथम मोड आलेली मटकी धुवून घ्या. त्यात थोडीशी हळद, मीठ आणि पाणी टाका. ते प्रेशर कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्यावी. मिसळ पावचा मसाला तयार करण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात आले, कांदा, लसूण, ओले खोबरे, टोमॅटो टाकून पेस्ट तयार करा.आता एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि थोडा कढीपत्ता घालावा. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि गरम मसाला घाला. आता मसाले सुवासिक होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावे.नंतर त्यात तयार मसाला पेस्ट घालून चांगले परतून घ्या.मसाला पेस्टपासून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.नंतर त्यात शिजलेली मटकी, गुळाचा छोटा तुकडा आणि मीठ घालावे. नंतर पाणी घालून चांगले शिजवा. मिसळ पूर्णपणे शिजेपर्यंत झाकण ठेवा आणि उकळवा. जेव्हा तेल वरती तरंगायला लागेल तेव्हा समजावे की मिसळ तयार आहे.सर्व्हिंग प्लेटमध्ये मटकी घेऊन त्यावर थोडे फरसाण टाका. वरून चिरलेला कांदा आणि हिरवी कोथिंबीरने गार्निश करा.पाव आणि लिंबाच्या फोडी घालून मिसळ गरमागरम खाण्यासाठी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com