Aamti Recipe : टेस्टी कडधान्याची आमटी खा अन् हेल्दी रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aamti Recipe

Aamti Recipe : टेस्टी कडधान्याची आमटी खा अन् हेल्दी रहा

हिवाळ्यात गरमागरम जेवणात टेस्टी आणि हेल्दी असं काही मेन्यू राहला की जेवणाची मजा येते. या टेस्टी जेवणात जर भाकरी झुणका किंवा आमटी राहली तर मेजवाणीचं होते. हिवाळ्यात अनेकजण गरमागरम आमटीचा आहारात समावेश करतात.

आज आपण टेस्टी आणि हेल्दी मिश्र कडधान्याची आमटी कशी करायची, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Winter Food : पौष्टिक डिंक अन् मेथीचे लाडू तेजीत; थंडीत ऊर्जा संवर्धनासाठी आहारामध्ये समावेश

साहित्य :

 • प्रत्येकी पाव वाटी चवळी

 • मूग व राजमा

 • चवीनुसार मीठ

 • आलं

 • लसूण वाटण

 • दोन टी स्पून भरून लाल तिखट

 • एक टी स्पून

 • गरम मसाला पाव टी स्पून

 • एक कांदा बारीक चिरून

 • कोथिंबीर

 • फोडणीसाठी तीन टी स्पून तेल

 • मोहरी

 • हिंग

 • हळद

हेही वाचा: Winter Season Food : ऐन थंडीत सुकामेवा गरम; मेथीचे लाडू बनविण्यासाठी गृहिणींची लगबग

कृती :

 • रात्री गार पाण्यात चवळी, अख्खे मूग, राजमा एकत्रच भिजत घालावे.

 • सकाळी प्रेशर कुकरमध्ये नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावे.

 • डावाने चांगले घोटून घ्यावे. वाटल्यास थोडे गरम पाणी घालून सारखे करून घ्यावे.

 • त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे.

हेही वाचा: Healthy Food For Winter : पाच लाडवांचे प्रकार हिवाळ्यात ठेवतील निरोगी

 • कढईत तेल घालून ते तापले की गॅस बारीक करावा व मोहरी, हिंग, हळद खमंग फोडणी करून घ्यावी व त्यावर कांदा घालून परतावा.

 • त्यावर कडधान्यांचे घोटलेले मिश्रण ओतून सारखे करावे.

 • गॅस मोठा करून एक उकळी आणावी. गरम मसाला व कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व वर लगेच झाकण ठेवावे.