
Monsoon Special Schezwan Maggi: पावसाळ्याच्या सिझनमध्ये सकाळचा नाश्ता बनवायचा कंटाळा येतो? मग तयार करा कॅफे स्टाइल 'शेजवान मॅगी. जी आहे झटपट, चविष्ट आणि मॉन्सूनच्या मूडला साजेशी! पावसाच्या सरी बाहेर कोसळत असताना, घरात बसून गरमागरम, मसालेदार मॅगी खाण्याची मजा काही औरच असते. ही रेसिपी केवळ सोपीच नाही, तर तुमच्या रोजच्या मॅगीला कॅफे स्टाइलचा ट्विस्ट देऊन खास बनवते. अगदी कमी वेळेत आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्याने तुम्ही बनवू शकता हा स्वादिष्ट नाश्ता. मग ते मसालेदार भाज्यांचा टच असो किंवा चीजचा मलिदा टॉपिंग, ही मॅगी तुमच्या सकाळला नक्कीच रुचकर बनवेल. पावसाळ्यातील थंड वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बसून या मॅगीचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया मॅगी बनवण्यासाठी कोणते साहित्य लगते आणि कृती काय आहे.