

Rawa Dhokla Recipe
Sakal
Rawa Dhokla Recipe: सकाळची धावपळ म्हणजे स्वयंपाकासाठी वेळच मिळत नाही अशी बरीच लोकांची तक्रार असते. अशावेळी पटकन तयार होणारे, हलके आणि पोटभर Dme काहीतरी नाश्त्यात करायला आवडते. रवा हा असा एक पदार्थ आहे की ज्यापासून अनेक झटपट रेसिपी बनतात आणि त्यातीलच एक म्हणजे रव्याचा ढोकळा. हा ढोकळा फक्त काही मिनिटांत तयार होतो, चवदारही लागतो आणि पोटालाही हलका असतो. यात दही, रवा आणि हलके मसाले वापरले जातात, त्यामुळे हा नाश्ता पौष्टिक आणि पचायला सोपा असतो. तसेच मुलांच्या टिफिनसाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केला तर त्याची चव आणखी वाढते. रवा ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.