

Morning Breakfast Recipe:
Sakal
Easy Breakfast Ideas For Kids In Marathi: बालदिन म्हटलं की मुलांसाठी काहीतरी खास बनवण्याचा उत्साह प्रत्येक घरात असतो. सकाळचा नाश्ता जर पौष्टिक आणि चविष्ट असेल, तर दिवसाची सुरुवातही आनंदी होते. म्हणूनच आज पोटॅटो चिलाची रेसिपी सांगाणार आहोत. जी मुलांना आवडेल आणि आईलाही बनवायला अगदी सोपी आहे. ही रेसिपी केवळ चवदारच नाही तर मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, कारण यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरचे मुबलक प्रमाण आहे. शाळेच्या डब्यात द्यायला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही झटपट तयार होणारी डिश उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया पोटॅटो चिला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.