

Pizza Paratha Recipe:
Sakal
Pizza Paratha Recipe: सकाळचा नाश्ता रोजचाच असला तरी त्यात थोडा वेगळेपणा आणला तर दिवस अधिक छान होतो. मुलांना किंवा तरुणांना नाश्त्यात काहीतरी चविष्ट आणि हटके दिलं तर त्यांची भूकही वाढते आणि मूडही. अशा वेळी साध्या पराठ्याची जागा घेऊ शकतो एक सुपर टेस्टी आणि झटपट बनणारा पर्याय पिज्झा पराठा. नाव जरी पिझ्झा पराठा असलं तरी त्यासाठी वेगळं काही साहित्य लागत नाही. घरात असलेली बेसिक भाजीपाला, चीज आणि सामान्य पराठ्याचे घटक वापरून हा स्वादिष्ट ब्रेकफास्ट काही मिनिटांत तयार होतो. यात पिज्जाचा क्रिस्पी आणि चीजी स्वाद मिळतो तर पराठ्याची पौष्टिकता सुद्धा कायम राहते. त्यामुळे मुलांना, ऑफिसला जाणाऱ्यांना किंवा अचानक भूक लागल्यास हा पदार्थ उत्तम आहे. पिज्जा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.