

healthy paratha recipe for New Year breakfast:
Sakal
healthy paratha recipe for New Year breakfast: नवीन वर्षाचा पहिला दिवस खास असावा असं सगळ्यांनाच वाटतं. नव्या सुरुवातीला सकाळी घरात चांगली, पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता असावा असे सर्वांनाच वाटते. अशावेळी रोजचा नेहमीचा नाश्ता न करता काहीतरी वेगळं आणि आरोग्यदायी बनवायचं असेल, तर पौष्टिक पराठा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हा पराठा बनवायला अगदी सोपा असून त्यासाठी फारसा वेळही लागत नाही. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा नाश्ता पोटभर आणि ऊर्जा देणारा असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरच्यांसोबत गरमागरम पराठा, दही किंवा लोणच्यासोबत खाल्ला तर आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे या नववर्षी सकाळची सुरुवात आरोग्यदायी आणि चविष्ट नाश्त्याने करा. चला तर मग जाणून घेऊया पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.