तुम्ही काय खाता?

मौशुमी नगरकर
Wednesday, 15 January 2020

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्र

काय खातो, यावरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्याचे पोषण होते. आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा एकमेकांना जोडलेली असते. आतड्याला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा मनावर परिणाम होतो किंवा मनाला काही त्रास जाणवू लागल्यास त्याचा आतड्यावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा खाद्यपदार्थ सूट झाला तर तो दुसऱ्या व्यक्तीला होईलच असे नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणतेही डायट सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीराची माहिती घ्यावी. डायट असे उच्चारताच बहुतांश जणांच्या मनात काहीही खायचे नाही, उपासमार, बेचव खाणे, केवळ सूप, सलाड खाणे असा विचार येतो. हा विचार सर्वथा चुकीचा आहे. 

डायट म्हणजे - योग्य आहार, दर्जा आणि वेळ

योग्य आहाराचे मापदंड 
 आपली प्रकृती.
 वजन अधिक आहे की प्रमाणापेक्षा कमी.
 शारीरिक रचना.
 कोणता आजार आहे का.
 तुम्ही कोणत्या प्रकारचे शारीरिक काम करता. (बैठे, कष्टाचे) 

हे प्राधान्याने लक्षात घ्या
 स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य द्या. आपल्या परिसरात पिकणारा भाजीपाला, फळे खा. 
 सर्व प्रकारचे अन्‍न खा.
 तेलकट पदार्थ टाळा. अगदीच खायची इच्छा झाल्यास घरगुती पद्धतीने बनविलेले किंवा शुद्ध तुपातील पदार्थ खा.
 प्रक्रिया केलेले, सीलबंद पदार्थ, फास्ट फूड टाळा.
 ताजे अन्न खा.
 फॅटी पदार्थ टाळा. 

पदार्थांचा दर्जा
 आपल्या संस्कृतीत ‘मिताहारा’वर भर दिला आहे.
 आपल्या भुकेपेक्षा तीन चतुर्थांश खा. पोटातील एकचतुर्थांश जागा रिकामी ठेवल््यामुळे पचनास मदत होते.
 भूक हा मनाचा खेळ आहे. अनेकदा भूक नसताना खाण्याची वासना होते. त्यातून अतिरिक्त खाण्याचा आजार होऊ शकतो. तुम्ही अतिरिक्त खाणे टप्प्याटप्प्याने कमी करा, त्यामुळे तुमचा ‘इटिंग पटर्न’ बदलू शकतो. 

खाण्याच्या वेळा
 अनेक व्यक्ती वेळेवर खाण्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण पुढे ढकलतात किंवा अत्यंत घाईघाईने, चुकीच्या पद्धतीने खातात.
 तुम्ही वरीलपैकी असे काही करत असल्यास ते थांबवा.
 ते आरोग्यदायी नसल्याने वाढेल.
 कमी खाण्याने वजन कमी होते हा समज चुकीचा आहे. 
 वेळेवर न खाण्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात.
 शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्‍यकता असते. त्यासाठी वेळेवर जेवणे आवश्‍यक आहे.
 वेळेवर न खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो आणि त्याचा शरीरातील अन्य अवयवांवर दुष्पपरिणाम होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moushumi nagarkar article food