esakal | पोषक-पूरक : शेंगदाणे
sakal

बोलून बातमी शोधा

शेंगदाणे

पोषक-पूरक : शेंगदाणे

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

भुईमुगाच्या शेंगेतल्या बिया म्हणजेच शेंगदाणे. दाण्याचे बाह्यावरण गुलाबी किंवा काळपट लाल असून, आतला दाणा पांढरा असतो. ते कच्चे भाजून किंवा उकडून खाल्ले जातात. भाजलेले शेंगदाणे सोलून त्याचे भरड कूट केले जाते व त्यापासून लाडू, वड्या उपवासाची आमटी असे पदार्थ करतात. कोशिंबिरी, उपवासाची भाजणी, साबुदाण्याचे वडे व खिचडी, रताळ्याच्या कीस असे उपवासाचे पदार्थ दाण्याच्या कुटाशिवाय होऊच शकत नाहीत.

शेंगदाणे कायमच आपल्या घरात असतात. जेवणानंतर मूठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. ते प्रोटिन आणि फायबरचे भांडार असून त्यात व्हिटॅमिन ई, के आणि बी ६ भरपूर प्रमाणात असते, त्यातील कॅल्शियम आणि ‘डी’ व्हिटॅमिनमुळे हाडांचे आरोग्य सुधारून ती बळकट होतात. शेंगदाण्यातून शरीराला मिळणारी स्निग्धता पोटाच्या तक्रारींवर फायदेशीर ठरते.

हेही वाचा: लग्नाची गोष्ट : प्रत्येक क्षण एन्जॉय करतो

त्याच्या सेवनामुळे गॅस व अॅसिडिटीची समस्या देखील कमी होते. शेंगदाणे व गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते व रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते.

कच्चे शेंगदाणे भिजवून खाल्ले असता त्यातील पोषकतत्त्वे शरीर पूर्णत: शोषून घेते. त्यामुळेच उपवासाला मुद्दाम भिजलेल्या दाण्यांची उसळ केली जाते. शेंगदाण्यापासून उपवासाव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. दाण्याची तिखट चटणी, गुडदाणी, चिक्की, खारे वा मसाला दाणे असे पदार्थ नेहमीच बनवले जातात. चिवडा, भडंग, पोहे, उपमा यांत दाणे घातल्याने ते चवदार होतात. या दाण्यापासून अतिशय चविष्ट असे पीनट बटर बनवले जाते. भुईमुगापासून तेल काढले जाते- जे चव आणि आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. अनेक घरांत रोजच्या स्वयंपाकात याच तेलाचा उपयोग केला जातो.

loading image
go to top