

Mushroom Omelet Recipe
Sakal
mushroom omelet for kids: वीकेंड आला की मुलांसाठी काहीतरी खास आणि चविष्ट बनवावंसं वाटतं. रोजच्या पोहे-उपम्यापेक्षा थोडं वेगळं, पण तरीही हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता हवा असेल तर मशरूम ऑम्लेट हा उत्तम पर्याय आहे. मशरूममध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन डी, बी-कॉम्प्लेक्स आणि आवश्यक मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात, जे मुलांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात. अंड्यांसोबत मशरूमची जोड दिल्यास हा पदार्थ अधिक पौष्टिक आणि पोटभर होतो.
सर्वात खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी फक्त 10 मिनिटांत तयार होते. त्यामुळे सकाळच्या घाईतही तुम्ही मुलांसाठी झटपट आणि टेस्टी नाश्ता बनवू शकता. हलका मसाला, थोडी भाजी आणि चीज घालून हे ऑम्लेट अजून आकर्षक बनवता येते. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.