माझी रेसिपी : चीज गार्लिक ब्रेड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

ब्रेड (व्हाईट), अर्धी वाटी बटर, चीजच्या ३/४ छोट्या किसलेल्या क्युब, चिमूटभर काळीमीर पूड, ७ ते ८ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा सिझनिंग हर्ब्स, १ चमचा चिलीफ्लेक्स, चवीपुरत मीठ.

entertainment साहित्य - ब्रेड (व्हाईट), अर्धी वाटी बटर, चीजच्या ३/४ छोट्या किसलेल्या क्युब, चिमूटभर काळीमीर पूड, ७ ते ८ ठेचलेल्या लसूण पाकळ्या, १ चमचा सिझनिंग हर्ब्स, १ चमचा चिलीफ्लेक्स, चवीपुरत मीठ.

कृती - सर्वप्रथम गार्लिक बटर तयार करण्यासाठी अर्ध्या वाटी बटरमध्ये ठेचलेला लसूण, काळीमिरी पूड, चीज, सिझनिंग हर्ब्स, चिलीफ्लेक्स आणि चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. मिक्स झाल्यानंतर ब्रेडच्या मधून कट मारून दोन स्लाईस कराव्यात. आता प्रत्येक स्लाईसवर वरच्या बाजूने तयार केलेले बटर लावून घ्यावे. आता एका पॅनवर ब्रेड गरम करून घ्या. ब्रेडवरचे चीज वितळू लागेल. ब्रेड चांगला गरम झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. छान टेस्टी लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Recipe Cheese Garlic Bread

Tags
टॉपिकस
Topic Tags: