माझी रेसिपी : गार्लिक पिझ्झा ब्रेड

अनुराधा खरे
Saturday, 15 August 2020

साहित्य - मध्यम आकाराचे ४ उकडलेले बटाटे, ५ चमचे मैदा, चिली फ्लेक्स, पिझा (ऑरेगानो), चिमूटभर मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑईल, १ चमचा बेकिंग पावडर.

साहित्य - मध्यम आकाराचे ४ उकडलेले बटाटे, ५ चमचे मैदा, चिली फ्लेक्स, पिझा (ऑरेगानो), चिमूटभर मीठ, २ चमचे ऑलिव्ह ऑईल, १ चमचा बेकिंग पावडर.

गार्लिक बटरसाठी - २ चमचे अमूल बटर, २ चमचे मेयोनीज, २ लहान चमचे लसूण बारीक केलेला, चिली फ्लेक्स, ऑरेगानो

बारीक चिरलेली सिमला मिरची, वाफवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर ४ ते ५ चमचे, मोजरेला चीज (नसेल तर साधे प्रोसेस्ड चीज)

कृती - उकडलेले बटाटे बारीक कुसकरून घ्यावेत. त्यात २ चमचे तेल, मीठ, बेकिंग पावडर, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, कोथिंबीर घालून सर्व मिक्स करावे. त्यात ४ चमचे मैदा टाकून कणकेसारखा गोळा बनवा. झाकून बाजूला ठेवा. बटर, मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑरेगानो, थोडी कोथिंबीर सर्व बाऊलमध्ये मिक्स करावे. मैद्याच्या कणेकचा गोळा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटावी. त्यावर गार्लिक बटर मेयोनीजचे मिश्रण लावावे. आता अर्ध्या भागावर सिमला मिरची, मक्याचे दाणे टाकावेत. किनारी सोडून, परत वर चिली फ्लेक्स, ऑरेगानो टाकावे. चीज किसून अर्धा भाग फोल्ड करावा. वर बटरने ब्रशिंग करावे. वरही चिली फ्लेक्स, ऑरेगानो, आणि थोडे चीज किसून टाकावे.

माइक्रोव्हेवला १८० डिग्रीवर २० मिनिट बेक करावे. किंवा कढईत रेती पसरून प्रीहीट १० मिनिट मध्यम गॅसवर मग प्लेटमध्ये ब्रशिंग केलेली अर्धी पोळी ठेवून २० मिनिटे ठेवावे. १० मिनिटे मोठ्या आचेवर नंतर १० मिनिटे मंद आचेवर. ब्रशिंग केलेल्या रोटीवर उभे काप सुरीने पाडावेत, थेट खोलवर नको.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my recipe garlic pizza bread

Tags
टॉपिकस
Topic Tags: