माझी रेसिपी : कैरीची चटणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

मध्यम आकाराची एक कैरी, गुळ व मीठ चवीनुसार, लसणाच्या दोन-तीन पाकळ्या, एक छोटा चमचा जिरे.

साहित्य - मध्यम आकाराची एक कैरी, गुळ व मीठ चवीनुसार, लसणाच्या दोन-तीन पाकळ्या, एक छोटा चमचा जिरे.

कृती - कैरीच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. कैरी वगळता सर्व साहित्य मिक्सरवर बारीक करून घ्यावे. त्यानंतर त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. दोन ते तीन वेळा मिक्सरवर हलके फिरवून घ्यावे. कैरीचे फार बारीक तुकडे करू नयेत. कैरीची चटणी तयार झाली. पोळीबरोबर अथवा नुसती तोंडी लावायलाही छान लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My recipe Mango chutney

Tags
टॉपिकस
Topic Tags: