esakal | ‘माझं पोट काहीही पचवू शकतं’ ; आयुष्मान खुराना
sakal

बोलून बातमी शोधा

food

‘माझं पोट काहीही पचवू शकतं’ ; आयुष्मान खुराना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- ग्लॅम-फूड

आपल्या विविधांगी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारा आयुष्मान खुरानाचं ‘चांगल्या पदार्थांमध्ये आनंद भरून राहिलेला असतो, आपण तो फक्त शेअर करायचा असतो,’ असं तत्त्व आहे. त्याचं पोट काहीही पचवू शकतं, असं तो सांगतो. इतकं की, ‘‘माझं मेटॅबोलिझम उसेन बोल्टपेक्षाही जलद आहे,’ असं तो म्हणतो. त्यामुळे कोणताही आवडता पदार्थ पोटात जाऊ द्यायला त्याची काहीही हरकत नसते. ‘माझा प्रॉब्लेम आहे, की मी सतत भुकेला असतो. पोट रिकामं असलं, की मी अस्वस्थ असतो,’ असं साहेबांचं म्हणणं.

त्याची काही खास तत्त्वंही आहेत. त्याला जेवण हातांनीच करायला आवडतं. चमचे-सुरीत ती मजा नसते असं तो म्हणतो. हातांनी खाल्लं, की खाण्याचा थेट आत्म्याशी कनेक्ट होतो, असं तो मानतो. चेन्नईत एका रेस्टॉरंटमध्ये केळीच्या पानांवर त्यानं जेवण केलं. ते त्याच्यासाठी स्वर्गसुख होतं. खाण्यात त्याला सगळ्यांत जास्त आवडतात त्या भाज्या- आणि गंमत म्हणजे अगदी कार्ली, पडवळ, कोबी काहीही! शूटिंगच्या वेळी शक्य असेल तिथं तो ‘घर का खाना’ पसंत करतो. आयुष्मान लहान असताना चंडीगडमधलं इंडियन कॉफी हाऊस त्याचं अतिशय आवडतं. सेलिब्रिटी झाल्यावरसुद्धा त्यानं नंतर त्या कॉफी शॉपला भेट देऊन खवय्येगिरीचा आस्वाद घेतला.

भारतात स्वयंपाक ही अतिशय विलक्षण कला आहे. एकाच वेळी वीस पाणीपुरी तयार करणं हे कौशल्याचं काम नाही का?’ असा सवाल तो विचारतो. आयुष्यमान त्याच्या डाएटिशिअनच्या सल्ल्यानुसार दिवसभरात पाच वेगवेगळी ‘मील्स’ घेतो. त्याचं तत्त्व म्हणजे या पाच ‘मील्स’च्या आधी आणि नंतर अर्धा तास पाणी पिणं. दूध आणि दुधाचे पदार्थ मात्र त्यानं त्याच्या फिटनेससाठी सोडून दिले आहेत. बाहेरून सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आहारातून पोषक पदार्थ जाणं योग्य असं आयुष्मान सांगतो. प्रोटिन्ससाठी सत्तूचं पीठ आणि ताक मिसळून एक खास पेय तो तयार करतो आणि पितो.

loading image
go to top