esakal | नूडल्स खाऊन खाऊन बोर झाले? आता घरीच तयार करा नूडल्स पकोडे

बोलून बातमी शोधा

Nagpur news Now make noodles pakoda at home}

आम्ही तुमच्यासाठी नूडल्स पकोडे हा नवीन प्रकार घेऊन आलो आहे. ही तयार करण्याची कृती अगदी सोपी आहे. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...

नूडल्स खाऊन खाऊन बोर झाले? आता घरीच तयार करा नूडल्स पकोडे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नूडल्स खायला सर्वांना आवडते. चायनीच फूडपैकी तो एक आहे. याचा चाहता वर्ग मोठा आहे. यामुळेच अनेकांनी ते कसे तयार कराने शिकून घेतले आहे. अनेकजण बाहेरचे नूडल्स खाण्यापेक्षा घरीच तयार केलेले नूडल्स खातात. बाहेरचे काय चव लागते. आपणच घरी चांगल्याप्रकारे तयार करतो असे म्हणत घरीच तयार केलेले नूडल्स खाण्याला प्राध्यान देतात. अशा शौकिनांसाठी आम्ही घेऊन आलो आहे नूडल्स पकोडे.

नूडल्स तयार करण्याची एकच पद्धत आहे. हॉटेल असो वा घर त्याच प्रकारे ते तयार केले जातात. मात्र, याचा काही वेगळा प्रकारही होऊ शकतो. याचा कोणी विचार करीत नाही. सांगायचं झाल तर कोणाला माहीतच नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी नूडल्स पकोडे हा नवीन प्रकार घेऊन आलो आहे. ही तयार करण्याची कृती अगदी सोपी आहे. चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...

लागणारी मुख्य सामग्री
दोन पॅकेट इन्स्टंट नूडल्स (१४० ग्रॅम), ५० ग्रॅम चिरलेले कांदे, दहा ग्रॅम चिरलेले हिरव्या मिरच्या, दहा ग्रॅम कोथिंबीर, शंभर ग्रॅम बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले), १५० ग्रॅम ब्रेड, ५० ग्रॅम मैदा, मीठ, काळी मिरी, पाणी व तीनशे मिली तेल.

अस करा तयार

नूडल्सला सुमारे तीनशे मिली पाण्यात उकळून घ्या. शिजवताना पॅनमध्ये पाणी शिल्लक नाही याची काळजी घ्या. यानंतर नूडल्सला काही वेळ थंड होऊ द्या. नूडल्स खोलीच्या तापमानावर आल्यावर कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, बटाटे व ब्रेडक्रंब टाकून चांगले मिसळवा आणि १० मिनिटे ठेवा. आता मिश्रणातून सुमारे वीस ग्रॅमचे लहान गोळे तयार करा. यानंतर पीठ, मीठ आणि मिरपूड एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ तयार करा.

सर्व गोळे पिठात हलके हलवा आणि उर्वरित ब्रेडक्रंब्ससह लपेटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात सर्व पकोडे घालून तळून घ्या. पॅनमधून पकोडे काढा आणि किचनच्या कागदावर ठेवा. असे केल्यास जास्त तेल बाहेर येईल. तयार झाले तुमचे झटपट नूडल्स.