esakal | साउथ इंडियन जेवणाचे चाहते आहात? तर घरीच ट्राय कर कांजीवरम इडली चाट

बोलून बातमी शोधा

Nagpur news Try Kanjivaram Idli Chaat at home}

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये इडली खाण्यासाठी गर्दी करणाऱ्यांची कमी नाही. अशाच खवय्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे कांजीवरम इडली चाट..

food
साउथ इंडियन जेवणाचे चाहते आहात? तर घरीच ट्राय कर कांजीवरम इडली चाट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : साउथ इंडियन जेवणांपैकी एक महत्त्वाची डीश म्हणजे इडली. ही डीश देशभर पसरती आहे. रस्त्याच्या कडेला याचे ठेले लागलेले असतात. यामुळे इडली खवय्यांसाठी आता काही नवीन राहिलेली नाही. तसेच घरोघरीही इडली तयार होते. मात्र, तुम्ही कधी कांजीवरम इडली खाल्ली आहे का? नाही ना... चला तर जाणून घेऊया तयार करण्याची पद्धत...

इडली म्हणजे काय? शेवटी वरण आणि भात असे जुने जाणकार म्हणतात. मात्र, तेही इडली खाण्याच्या मोह टाळू शकत नाही. मऊ आणि गरमा गरम इडली प्रत्येकाला आवडत असते. चांगला नाश्ता म्हणून याचा वापर होतो. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये इडली खाण्यासाठी गर्दी करणाऱ्यांची कमी नाही. अशाच खवय्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहे कांजीवरम इडली चाट..

लागणारी मुख्य सामग्री

पाचशे ग्रॅम इडली रवा, २५० ग्रॅम उडीद डाळ, १५ ग्रॅम चणा डाळ, दोन ग्रॅम मेथी दाणे, पाच ते साथ ग्रॅम साखर, ५० ग्रॅम फ्रेंच बीन्स, पन्नास ग्रॅम गाजर, पन्नास ग्रॅम किसलेले नारळ, पंधरा ते वीस ग्रॅम ताजे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, दोनशे ग्रॅम गोड दही, पंचवीस ग्रॅम कोरडा आले सॉस, २५ ग्रॅम पुदिना चटणी, दहा ग्रॅम सेव्ह, दहा ते १५ ग्रॅम डाळिंब बियाणे, पाच ग्रॅम चाट मसाला, भाजलेला जिरे व मीठ.

तयार करण्याची ही आहे पद्धत

सर्वांत अगोदर उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथीचे दाणे चांगल्याप्रकारे धुऊन घ्या. यानंतर ते दोन तास भिजू द्या. यानंतर पाणी काढून टाका आणि साहित्य बारीक करून पीठ तयार करा. रवा धुऊन काही काळ भिजवून तयार पिठात मिसळा. यानंतर मीठ आणि साखर घाला. याचे एकत्र करून एक तासासाठी झाकून ठेवा.

या वेळात सर्व भाज्या धुऊन बारीक चिरून घ्या. पिठात किसलेले नारळ, हिरवी मिरची आणि चिरलेली अर्धी कोथिंबीर टाकून परतून घ्या. इडली स्टीमरमध्ये पाणी गरम करून इडली साच्यात घाला आणि ते १५ मिनिटे वाफवून घ्या. यानंतर बाहेर काढून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर इडलीला गोड दहीमध्ये भिजवून घ्या. यानंतर एका प्लेटवर ठेवून त्यात आलेची चटणी, पुदिना चटणी, भाजलेली जिरेपूड, शेव, डाळिंब, चाट मसाला घालून सर्व्ह करा.