Navratri Recipe: आज उपवासाला खा टेस्टी साबुदाणा पराठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri recipe

Navratri Recipe: आज उपवासाला खा टेस्टी साबुदाणा पराठा

नवरात्रीच्या या नऊ दिवसात रोज रोज उपवासाला काय खायचं हा प्रश्न निर्माण होतो. त्यात मग साबुदाणाची खिचडी, भगर आपण नेहमीच करतो पण आज आम्ही तुम्हाला थोडी हटके रेसिपी सांगणार आहोत. आज आपण साबुदाणा पराठा कसा करायचा, हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Navratri Recipe: केळीचा रायता कसा तयार करायचा ?

साहित्य -

 • भिजवलेला साबुदाणा

 • उकडलेले बटाटे

 • दाण्याचा कुट

 • मीठ

 • लाल तिखट

 • तूप

 • मिरच्या

हेही वाचा: Navratri Recipe: उपवासाला करा टेस्टी राजगिऱ्याच्या पुऱ्या

 • कृती
  साबुदाणा भिजवून घ्यावा त्यानंतर त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त साबुदाणा मिक्सरमधून बारीक करावा.

 • एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, मिक्सरमधून बारीक केलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, बारीक कापलेली मिरची, दाण्याचा कुट आणि मीठ टाकून सर्व एकजीव करावं.

 • पीठाचा छोटे छोटे गोळे करावे आणि तूप लावून पराठा थापून किंवा लाटून घ्यावा.

 • गरम तवावर तूप सोडून त्यावर साबुदाण्याचा पराठा टाका.

 • पराठा दोन्ही बाजूला खमंग भाजून घ्यावा. हा पराठा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.