Video : 'चिकन पोपटी' खायचंय? मग हॉटेल कांजीला भेट द्याच!

नेहा मुळे 
Friday, 29 November 2019

खवय्ये पुणेकरांना कुठल्याच भारतीय अथवा विदेशी पदार्थांची जाण नाही हे जवळजवळ अशक्य आहे. पण पोपटी किंवा चिकन पोपटी म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. कोकणात प्रसिद्ध असलेली पोपटी ही डिश क्वचितच लोकांना माहीत असेल.

वीकएंड हॉटेल 

खवय्ये पुणेकरांना कुठल्याच भारतीय अथवा विदेशी पदार्थांची जाण नाही हे जवळजवळ अशक्य आहे. पण पोपटी किंवा चिकन पोपटी म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. कोकणात प्रसिद्ध असलेली पोपटी ही डिश क्वचितच लोकांना माहीत असेल.

अख्खं गाव कांदा-लसूण खात नाही! काय असेल कारण?

अलीकडच्या काळात हुरडा पार्टीची क्रेझ वाढली आहे. पुणेकर त्याचा आनंद घेताना दिसतात. हुरड्याचा सीझन थंडीत आहे त्याप्रमाणेच पोपटीचा आनंद ही थंडीध्येच घेता येतो. कोकणात पोपटी पार्टी म्हणजे एक भन्नाट प्रकार. या पदार्थाची चव पुणेकरांना बाणेर - म्हाळुंगे रस्त्यावरील ‘हॉटेल कांजी’च्या माध्यमातून घेता येईल.

पोपटीबद्दल सांगताना ‘हॉटेल कांजी’चे निनाद पाडळे सांगतात, ‘भांबुर्ड्याचा पाला हा पोपटीचा सर्वांत महत्त्वाचा घटक. हा पाला कोकणात हिवाळ्यात उगवतो आणि यामधील घटक केवळ भांबुर्ड्याच्या ओलाव्यावर शिजतात. अनेकांसाठी मातीवरच्या चुलीवरचे नॉनव्हेज म्हणजे परमोच्च आनंदच असतो. पोपटीचे मुख्य आकर्षणही हेच आहे. काळ्या मातीच्या माठामध्ये भांबुर्ड्याचा थर, त्यावर मॅरिनेट केलेले बटाटे, फ्लॉवर, पावट्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा ठेवला जातो. अजून एक थर रचून त्यावर मॅरिनेट केलेले चिकन आणि अंडी ठेवून त्यावर भरपूर पाला गच्च कोंबून माठ पॅक केला जातो. हा माठ उलट करून शेकोटी पेटवून साधारण पाने २०-३० मिनिट पोपटी शिजवली जाते. गुलाबी थंडीमध्ये मस्त शेकोटीची पण मजा या पोपटीमुळे मिळते. म्हणूनच कोकणात भांबुर्ड्याच्या या २ महिन्याच्या सीझनमध्ये मध्यरात्री चिकन पोपटी पार्ट्या रंगतात.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

कुटुंबातील सदस्य, शेजारी यांच्यासोबत हा बेत जमतो. ‘हॉटेल कांजी’च्या पोपटीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातले सगळे पदार्थ हे सेंद्रिय आहेत आणि तेल व तुपाचा वापर न करता हे सर्व शिजवले जाते. त्यामुळेच हा एक हेल्दी पदार्थ ठरतो. 

पुण्यात थंडी वाढायला लागली आहे आणि आपल्या मित्रपरिवारासह या खास डिशचा आस्वाद घ्यायची यापेक्षा चांगली वेळ नाही. ‘हॉटेल कांजी’ला चिकन अथवा व्हेज पोपटीच्या निमित्ताने तुम्ही कुटुंबीयांसोबत चांगला वेळसुद्धा घालवू शकता. ही डिश पुण्यात कुठेच मिळत नाही. लोकांना ही डिश कमर्शिअली मिळावी, या हेतूने निनाद यांनी ‘हॉटेल कांजी’ उघडले आहे. भांबुर्ड्याच्या पाला खास अलिबागवरून आणला जातो. त्यामुळे या पोपटीची प्री-बुकिंग करणे, आवश्यक आहे. त्यासाठी जाण्यापूर्वी त्यांना नक्की कॉल करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new dish chicken Popti at Hotel Kanji