घरच्या घरी बनवा ओट्स मंचुरियन, ही आहे रेसिपी | Oats Manchurian | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oats Manchurian Recipe
घरच्या घरी बनवा ओट्स मंचुरियन, ही आहे रेसिपी

घरच्या घरी बनवा ओट्स मंचुरियन, ही आहे रेसिपी

मंचुरियनच्या या रेसिपीत ओट्सबरोबर वेगवेगळ्या भाज्या टाकल्या जातात. ओट्सच्या पीठापासून बनवलेले गोळे तळण्याऐवजी ती भाजली जातात लागतात. तर चला जाणून घेऊ या ओट्स मंचुरियन (Oats Manchorian) रेसिपीविषयी...

साहित्य

- १०० ग्रॅम ओट्स

- १ कांदा (कापलेला)

- १ अद्रक

- ३-४ लसणाच्या पाकळ्या (बारीक कापलेले)

- २-३ हिरव्या मिरच्या (बारीक कापलेले)

- १ शिमला मिरची ( बारीक कापलेला)

- १ गाजर ( बारीक कापलेला)

- १ टेबल स्पून पत्ता कोबी ( कापलेला)

- स्वादानुसार मीठ

- १/२ टी स्पून काळी मिरची

- तेल

- १ टेबल स्पून तांदळाचे पीठ

- १ टेबल स्पून टोमॅटो साॅस

- १ मध्यम आकाराची शिमला मिरची

हेही वाचा: थंडीत अनेक आजारांवर मात करेल 'ही' बर्फी ; जाणून घ्या रेसिपी

कृती

- एक वाटी घ्या. त्यात भाज्या, ओट्सचे पीठ आणि थोडेसे तांदळाचे पीठ टाका.

- या मिश्रणापासून छोटे-छोटे गोळे बनवा. (पीठ मऊ असायला हवे.)

- एक इडली /अप्पे पॅन किंवा बेकिंग ट्रे घ्या. त्यात ती गोळे ठेवा. ती ५-६ मिनिटांपर्यंत भाजा. सोनेरी रंग येईपर्यंत ती मधे-मधे वर-खाली करा.

- एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करा. त्यात अद्रक आणि लसूणचे पेस्ट आणि सर्व कापलेल्या भाज्या टाकून भाजून घ्या.

- मीठ आणि काळी मिरचीबरोबर साॅस टाका आणि २-३ मिनिटांसाठी गॅसवर ठेवा.

- शेवटी मिश्रणात भाजलेली मंचुरियन गोळे टाका आणि ती पाच मिनिटांपर्यंत उकडा. जर आवश्यकता भासल्यास पाणी टाका.

- सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.

loading image
go to top